वाशी आरटीओ तर्फे गेल्या ८ दिवसांपासून मोहिम

 प्रवासी बस चालकांवर ‘आरटीओ'ची करडी नजर!

वाशी :  दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांची संख्या वाढत आहे. विशेषतः दुभाजकाला वाहन धडकने, नियंत्रण सुटणे, यामुळे वाहन अपघात वाढले आहेत. त्यामुळे दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांवर वचक ठेवून, वाहन अपघात कमी करण्यास मदत होण्याच्या अनुषंगाने आरटीओ द्वारे मागील ८ दिवसांपासून खासगी प्रवाशी बस, शालेय वाहने यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात विविध महामार्गांवर प्रवासी बस अपघातांची संख्या वाढत आहे. चालकांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने, अतिवेगाने वाहन चालविल्याने वाहन अपघात होत आहेत. काहीं ठिकाणी बस चालक दारुच्या नशेत बस चालवित असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. त्यामुळे वाढणारे वाहन अपघात टाळण्यासाठी परिवहन कार्यालयाने आरटीओ प्रशासनाला भरधाव, अतिवेग, ड्रिंक अँड ड्राईव्ह वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाशी आरटीओ तर्फे गेल्या ८ दिवसांपासून खासगी प्रवाशी बस तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत ७५ खासगी प्रवाशी बसची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, या तपासणी मध्ये अद्याप एकही चालक दोषी आढळला नसून, त्याचबरोबर शालेय बस चालकांची देखील तपासणी सुरु आहे, अशी माहिती वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गोदामातून विषारी पाणी नाल्यात सोडल्याने पाणी दुषित