उरण तालुका मनसेच्या वतीने "एक सही संतापाची " हा अनोळखा उपक्रम

उरण मध्ये मनसेचा अनोळखा निषेध " एक सही संतापाची"

उरण : देशात व राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यापेक्षा सत्तेच्या हव्यासापोटी सध्याची राजकीय मंडळी बिनधास्तपणे सत्तेचा लोणी खाण्यासाठी धडपडत आहे. यासर्व गोष्टींचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण तालुका मनसेच्या वतीने "एक सही संतापाची " हा अनोळखा उपक्रम उरण मध्ये रविवारी ( दि९)राबविण्यात आला.

मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक सही संतापाची या अनोळख्या उपक्रमात उत्स्फूर्त पणे सर्व सामान्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शवून सत्तेत सहभागी झालेल्या राजकीय मंडळीचा निषेध आप आपली सही मनसेच्या व्यासपीठावरील बँनवर रेखाटून व्यक्त केला. यावेळी उरण तालुका मनसेचे अध्यक्ष सत्यवान भगत , तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, राकेश भोईर, महिला तालुका अध्यक्षा सौ ललिता म्हात्रे , विभाग अध्यक्ष बबन ठाकूर ,अनिल गावंड, संदीप ठाकूर ,समाधान गोधळी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सी-लिंक बाधित १३२ मच्छीमार बांधवांना एक रवकमी नुकसान भरपाई