जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी तपासणी

पाणी गाळून, उकळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणे ः पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी केले आहे.

नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करुन घ्याव्यात. पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

ठाणे महापालिका आरोग्य विभागातर्फे जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण पावसाळा काळात वाढविण्यात येते. ठाणे शहरात वेगवेगळ्या भागात आवश्यकतेनुसार नागरिकांना क्लोरिन गोळ्यांचे वाटप करण्यात येते. त्याचबरोबर, ओआरएस पाकिटे दिली जातात. तसेच, महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात योग्य त्या औषधांचा साठाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे ठाणे महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळ्यातील साथरोग आजार टाळण्याकरिता पनवेल महापालिकेतर्फे आवाहन