कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर!

गणेशोत्सव काळात ‘कोकण रेल्वे' मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा

नवी मुंबई : गणपती उत्सव-२०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ‘कोकण रेल्वे'ने ‘मध्य रेल्वे'च्या समन्वयाने खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर अतिरिवत प्रवासी सुविधेचा कोकणातील श्री गणेश भवतांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘कोकण रेल्वे'च्या वतीने करण्यात आले आहे.

त्यानुसार गाडी क्र. ०११७१/०११७२ मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) : ट्रेन०११७१ मुंबई सीएसएमटी- सावंतवाडी रोड स्पेशल (दैनिक) १३/०९/२०२३ ते २/१०/२०२३ पर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज ००.२० वाजता सुटेल. सदर गाडी त्याच दिवशी १४.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्र.०११७२ सावंतवाडी रोड-मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) सावंतवाडी रोड वरुन १३/०९/२०२३ ते २/१०/२०२३ पर्यंत दररोज १५.१० वाजता सुटेल. सदर ट्रेन दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.सदर गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. या गाडीमध्ये एकूण २० एलएचबी कोच, स्लीपर-१८ कोच, जनरेटर कार-१, एसएलआर-१ असेल.

गाडी क्र.०११५३/०११५४ दिवा जंवशन- रत्नागिरी- दिवा जंवशन मेमू स्पेशल (दैनिक)ः गाडी क्र.०११५३ दिवा जंवशन-रत्नागिरी मेमू स्पेशल (दैनिक) दिवा जंक्शन येथून सुटेल. ट्रेन १३/०९/२०२३ ते २/१०/२०२३ पर्यंत दररोज ७.१० वाजता सुटून त्याच दिवशी १४.५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्र.०११५४ रत्नागिरी-दिवा जंवशन मेमू स्पेशल (दैनिक) रत्नागिरी येथून १३/०९/२०२३ ते २/१०/२०२३ पर्यंत दररोज १५.४० वाजता सुटेल. ट्रेन दिवा जंक्शनला त्याच दिवशी २२.४० वाजता पोहोचेल. सदर गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा असेल.
या गाडीला एकूण ११ कार मेमू कोच असतील.


ट्रेन क्र.०११६७ /०११६८ लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषः गाडी क्र.०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३3, १४, १९, २०, २१ सप्टेंबर २०२३ रोजी २२.१५ वाजता सुटेल. तर सदर गाडी २४, २५, २६, २७, २८ सप्टेंबर, १ आणि २ ऑवटोबर रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कुडाळला पोहोचेल.

गाडी क्र.०११६८ कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०वाजता सुटेल. तर परतीला २५, २६, २७, २८, २९ सप्टेंबर आणि २, ३ ऑवटोबर रोजी २१.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. सदर गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकावर थांबेल. या गाडीला एकूण २० कोच असून त्यात २ टायर एसी-१ कोच, ३ टायर एसी-२ कोच, स्लीपर-१० कोच, जनरल-५ डबे, एसएलआर-२ राहणार आहेत.

गाडी क्र.०११६९ पुणे जंवशन-करमाळी आणि गाडी क्र.०११७० कुडाळ-पुणे जंवशन विशेष (साप्ताहिक) :  गाडी क्र.०११६९ पुणे जंवशन-करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून १५, २२ आणि २९ सप्टेंबर २०२३ रोजी १८.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १० वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर परतीला गाडी क्र.०११७० कुडाळ-पुणे जंवशन विशेष (साप्ताहिक) कुडाळ येथून १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑवटोबर २०२३ रोजी १६.०५ वाजता सुटून पुणे जंक्शनला दुसऱ्या दिवशी ५.५० वाजता पोहोचेल.

०११७०गाडीला सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. तर गाडी क्र.०११६९ नमूद सर्व स्थानकांवर थांबेल. तसेच सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.
या गाडीला एकूण २२ कोच असून यात २ टायर एसी-१ कोच, ३ टायर एसी-४ कोच, स्लीपर-११ कोच, जनरल-४ डबे, एसएलआर-२ असणार आहेत.

गाडी क्र.०११८७ करमाळी-पनवेल, ०११८८ पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)ः गाडी क्र.०११८७ करमाळी-पनवेल विशेष (साप्ताहिक) १६, २३ आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी करमाळी येथून १४.५० वाजता सुटेल. सदर ट्रेन दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.

गाडी क्र.०११८८ पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑवटोबर २०२३ रोजी पनवेल येथून ५ वाजता सुटून त्याच दिवशी १४ वाजता कुडाळला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८८ रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्टेशन येथे थांबेल. तर गाडी क्र.०११८७ ला सदर स्थानकांसह आणि थिविम आणि सावंतवाडी रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.या विशेष गाडीला एकूण २२ कोच असून त्यात २ टायर एसी-१कोच, ३ टायर एसी-४ कोच, स्लीपर-११ कोच, जनरल ४ डबे, एसएलआर-२ अशी रचना आहे.

ट्रेन क्र.०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी-मडगांव जंवशन- मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक)ः गाडी क्र.०११५१ मुंबई सीएसएमटी-मडगांव जंवशन विशेष (दैनिक) १३ सप्टेंबर ते २ ऑवटोबर २०२३ पर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज ११.५० वाजता सुटेल. सदर ट्रेन मडगांव जंक्शन दुसऱ्या दिवशी २.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्र.०११५२ मडगांव जंवशन-मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) मडगांव जंक्शन सुटेल. १४ सप्टेंबर ते ३ ऑवटोबर २०२३ या कालावधीत दररोज ३.१५ वाजता मडगांव येथून सुटून मुंबई सीएसएमटीला त्याच दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल.

गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्टेशन येथे थांबेल. या गाडीला एकूण २० कोच असून त्यात स्लीपर-१८ कोच, जनरेटर कार-१, एसएलआर-१ अशी रचना आहेत.

सदर गणपती स्पेशल गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठीwww.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन ‘कोकण रेल्वे'तर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न