आई एकविरा देवी बद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पोलीस ठाणे मध्ये तक्रार

एकविरा देवीबद्दल चुकीच्या भाषेचा वापर

वाशी : अवघ्या महाराष्ट्राची तसेच आगरी कोळी-समाजाची कुलदेवता मानली जाणारी देवी म्हणून कार्ला गडावरील ‘एकविरा देवी' सर्वज्ञात आहे. मात्र, ९ मे रोजी इंस्टाग्राम या सोशल साईटवर आई एकविरा देवी बद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे येथील समस्त आई एकविरा देवी भक्तांच्या भावना दुखावल्या असून, भक्तांच्या मनात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे आई एकविरा देवी बाबत चुकीच्या भाषेचा वापर करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा राखी पाटील यांनी ‘वाशी पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, आई एकविरा देवी बद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यवतींवर योग्य वेळेत कारवाई केली नाही तर समस्त एकविरा देवी भक्तांकडून नवी मुंबई ते लोणावळा कार्ला गड दरम्यान मानवी साखळी उभी करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राखी पाटील यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स'मुळे नवी मुंबईच्या पर्यटनात भर