पलेमिंगो सुरक्षेसाठी डी.पी.एस तलावाला महापालिकेकडून कुंपण

पलेमिंगो सिटी गुलाबी पाहुण्यांचे करणार संरक्षण

नवी मुंबई ः पलेमिंगोचे मानवी हस्तक्षेपापासून संरक्षण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पामबीच मार्गावरील डी.पी.एस. तलावाला पूर्णपणे कुंपण घालण्याचे मान्य केले आहे. गुलाबी पक्षी अर्थात पलेमिंगोचे जवळून दर्शन घेण्याच्या घाईत एक महिला चिखलात अडकल्याने नवी मुंबई महापालिकेने  यापूर्वी पलेमिंगोचे वास्तव्य असलेल्या डी.पी.एस. शाळेलगतच्या तलावाला अर्धवट कुंपण घातले होते. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी पलेमिंगो पक्षांच्या तसेच लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच विविध प्राधिकरणांना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. महापालिकेने तलावाला घातलेले कुंपण अपुरे पडत आहे. यामुळे तलावाच्या काठाने मोठे खड्डे झाले आहेत, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

ठाणे क्रीक पलेमिंगो सँवच्युरी (टी.सी.एफ.एस.) मध्ये उंच भरतीच्या वेळी येथे विश्रांती घेणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांना बघण्यासाठी अतिउत्साही लोक तलावाच्या वाळूच्या भागात गर्दी करत आहेत. विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांच्या कळपांना उडायला लावून नंतर सेल्फी काढण्यासाठी काही उपद्रवी लोक त्यांना दगड देखील मारत असल्याची अत्यंत विदारक बाब बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित पक्षांना इजा होत असल्याने ते गुन्हेगारी कृत्य आहे, असे ‘खारघर हिल्स अँड वेटलॅण्डस्‌ फोरम'च्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. बी. एन. कुमार आणि ज्योती नाडकर्णी या दोघांनी १७ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. तसेच महापालिकेने अर्धवट काम पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली. यानंतर आयुवत नार्वेकर यांनी डी.पी.एस. तलावाला पूर्ण कुंपण करण्याचे आश्वासन दिले. तसेच दगड मारणाऱ्यांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी कारवाईचा इशारा देणारे फलक ठेवले जाईल, असेही नार्वेकर यांनी आश्वासित केले.

तर आजारी किंवा जखमी पलेमिंगो आणि इतर स्थलांतरीत पक्ष्यांची काळजी पक्षी बचाव पथकांना घ्यावी लागत असताना आपत्कालीन परिस्थितीत उघडता येईल असे कुंपणाच्या बाजूला एक गेट ठेवण्याची सूचनाही ज्योती नाडकर्णी यांनी महापालिकेला केली आहे. एकंदरीतच महापालिका आयुवतांच्या आश्वासनानंतर पलेमिंगो सिटी गुलाबी पाहुण्यांचे संरक्षण करेल, अशी अपेक्षा बी. एन. कुमार यांनी व्यवत केली. दरम्यान, स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या कमालीची वाढली आहे. नवी मुंबईला पलेमिंगो सिटीचा दर्जा मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एम.एम.आर.) पाणथळ जागा नष्ट होत असल्याने सदर उत्साह फार काळ टिकू शकणार नाही, अशी भिती नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान सारख्या पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा ; पनवेल महानगरपालिका ड वर्ग गटामध्ये राज्यातून प्रथम