‘चावी द की..' ने पटकावले बेस्ट ऑफ मुव्हीचे पारितोषिक

‘चावी द की..'या लघुचित्रपटास पारितोषिक

 नवी मुंबई ः आर्यारावी एंटरटेनमेंट आयोजित राष्ट्रीय लघुचित्रपट फिल्म फेस्टिवल या प्रथम फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या मनोहर फुंडेकर लिखित दिग्दर्शक वंश मुव्हीज प्रॉडक्शनखाली तयार करण्यात आलेल्या चावी द की या लघुचित्रपटास बेस्ट ऑफ मुव्ही हा पारितोषिक प्राप्त झाला आहे..

प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खापरे, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे, रात्रीस खेळ चाले फेम कलावती  संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडे यांच्या उपस्थितीत तो ‘चावी..' चे लेखक मनोहर फुंडकर, तसेच विवेक केणी व सहकाऱ्यांनी स्विकारला. चिरनेर गावचे लेखक-नाटककार मनोहर फुंडेकर यांनी याहीपूर्वी विविध नाटके, काही चित्रपट कथाही लिहिल्या असून दहा आकडी भ्रमणध्वनी क्रमांक त्याच्या धारकाच्या नावासह मुखोद्गत करण्याबाबत त्यांची पंचक्रोशीरत ख्याती आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे