‘बंगाली असोसिएशन'तर्फे ‘शारदोत्सव'चे आयोजन

वाशी येथे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठा दुर्गा पुजा उत्सव

नवी मुंबई :  बंगाली नागरिकांच्या सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या सामाजिकसांस्कृतिक संघटनांपैकी महाराष्ट्रातील एक नवी मुंबई बंगाली असोसिएशन (एनएमबीए), वाशी यांच्या वतीने वाशी मध्ये भव्य शारदोत्सव (दुर्गा पुजा उत्सव-दसरा) आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या या उत्सवात सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल असेल. २० ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे दुर्गा पुजा उत्सव साजरा केला जाणार आहे. ‘एनएमबीए'च्या या ‘शारदोत्सव'चे यंदा ४४ वे वर्ष असून त्यासाठी किमान ५ लाख भक्त हजेरी लावतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. एनएमबीए, वाशी मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या अशाप्रकारच्या पहिल्याच
भव्य दुर्गा पुजा उत्सवात सर्वांना अध्यात्म आणि सणाचा उत्साह असा दुहेरी अनुभव घेता येईल. ‘एनएमबीए'च्या या उत्सवात देशभरातील बंगाली कारागीर आपल्या हस्तकलांची विक्री करतील, तर कोलकाता आणि बॉलिवुड मधील सेलिब्रेटी कलाकार सहभागी होऊन या उत्सवाची रंगत आणखी वाढवतील. ‘एनएमबीए'च्या या उत्सवाला भेट देणान्या भाविकांसाठी तीन दिवस मोफत प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, या वर्षीच्या एनएमबीए कार्निव्हल साठी भालोबासा आयुष्याची नवी पहाट-२०२३ अशी आकर्षक संकल्पना ठेवण्यात आली आहे. १९८१ मध्ये स्थापन झालेल्या ‘एनएमबीए'ने विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांचा प्रसार केला आहे. ‘एनएमबीए'च्या सदस्यांमध्ये नवी मुंबई, मुंबई, पुणे आणि भारतातील इतर भाग तसेच परदेशातील नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती ‘एनएमबीए'चे व्यवस्थापकीय कौन्सिल सदस्य यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘जागतिक बँक'च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट