प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम

कोकण विभागात ५४ ठिकाणी उदघाटन -आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रासह कोकण विभागात १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात ९ केंद्र, पालघर मध्ये १२, रायगड जिल्ह्यामध्ये १४, रत्नागिरी जिल्ह्यात ११ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात ८ असे एकूण ५४ ठिकाणी एकाच वेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे कोकण विभागातील कौशल्य विकास केंद्रांचे उद्‌घाटन होणार आहे.

१६ ऑवटोबर रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केद्रांच्या उद्‌घाटन संबंधी आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (ठाणे), गोविंद बोडके (पालघर), डॉ. योगेश म्हसे (रायगड), एम.देवेद्र सिंह (रत्नागिरी), किशोर तावडे (सिंधुदुर्ग), उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अजित साखरे, अपर जिल्हाधिकारी हनुमंत आरगुंडे, ‘कौशल्य विकास विभाग'चे सहाय्यक आयुक्त चाटे, उपायुक्त डी.डी.पवार, आदि उपस्थित होते.

ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार-स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, राज्यातील कामागरांचा आभाव दूर करण्यासाठी कोशल्य कामगारांचा पुरवठा करणे, अकुशल मनुष्य बळाला कौशल्यपूर्ण बनविणे गरज असल्यास पुनःकौशल्य देणे तसेच सध्याच्या कुशल मनुष्यबळाला करियर मध्ये वरच्या पातळीचे कौशल्य विकास प्रशिक्षण देणे यासाठी राज्यभरात ३४ जिल्ह्यातील ३५० तालुक्यांतील ५११ गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. प्रती केंद्र ग्रामीण भागातील १०० उमेदवारांच्या, प्रती वर्ष सुमारे ५० हजार उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे.
कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या उद्‌घाटन प्रसंगी स्वतः उपस्थित राहवे. या कार्यक्रमाची विशेष प्रसिध्दी करावी. सदर कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक महाविद्यालयातीन विद्यार्थी, स्थानिक प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रातील नोंदणी केलेले प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांना आमंत्रित करुन कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी दिल्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगरपरिषदांमधील माती एकत्रीकरण कार्यक्रम संपन्न