मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेने पटकाविले

'बेस्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन युनिट'चे प्रथम पारितोषिक

ठाणे  : ट्रेंड नर्सेस असोशिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा  व मराठा  विद्या प्रसारक मंडळ  इन्स्टिट्युट ऑफ  नर्सिंग एज्युकेशनचे  यांच्या संयुक्त विद्यमाने  स्टूडेंट नर्सेस असोसिएशन चे 30  वे राज्य स्तरीय अधिवेशन नाशिक येथे नुकतेच पार पडले. या अधिवशेनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या 29 विद्यार्थी परिचारिका सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थींनीनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेवून एकूण 11 परितोषिके पटकाविली. तर संपूर्ण महाराष्ट्रातून Best Student Nurses Association युनिट हे मानाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेस मिळाले असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी परिचारिका, संस्थेच्या प्राचार्या यांचे कौतुक केले आहे.

नाशिक येथील गुरूदक्षिणा सभागृह येथे हे अधिवेशन पार पडले. या अधिवशेनात राज्यभरातील विविध परिचर्या संस्थेतून जवळपास 877 विद्यार्थी परिचारिका सहभागी झाल्या होत्या. यावेळी झालेल्या पोस्टर स्पर्धेत 'बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन, ऑस्टॉमी केअरमध्ये नर्सची भूमिका, स्टुडंट नर्सिग असोसिएशनची व्हिजन 2029 शताब्दी, मूत्रप्रणाली, पोस्अ कोविड युग नर्सिंगमध्ये…' ही पोस्टर्स साकारणाऱ्या सुरभी वाडकर, शबाना खान, प्राजक्ता कोंगरे, मृण्मयी जाधव या विद्यार्थी परिचारिका विजेत्या ठरल्या. तर रांगोळी स्पर्धेत ध्रुवी देसाई हिला तर नृत्यस्पर्धेत वेदिका आणि सहकारी यांनी पारितोपिक पटकाविले.  मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेने  एकूण 11 पारितोषिके प्राप्त केली.

प्रथम तीन पारितोषिक प्राप्त विजेते 25 व 26 नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप धारप  व नर्सिंग टुयटर  वर्षा पाटील यांचे या विद्यार्थींनींना विशेष मागर्दशन लाभले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांचा पाठिंबा या संस्थेस मिळत असून संस्थेस मिळालेल्या बेस्ट स्टुडंग नर्सेस ॲवार्डबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रस्त्यांची कामे १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा