सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर महापालिका सकारात्मक

१३ दिवसांपासून सफाई कामगारांचे महापालिका मुख्यालयाजवळ आंदोलन

नवी मुंबई : आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. तसेच शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी साफसफाई कर्मचारी आपले काम चोख पध्दतीने पार पाडत असतात. परंतु, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्याअनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ६ ऑवटोबर रोजी ‘समाज समता कामगार संघ'च्या पदाधिकारी आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. यावेळी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांना आश्वस्त करताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर सुट्टीवर हजर होताच प्रथम बैठक ‘समाज समता कामगार संघ'च्या शिष्टमंडळासोबत असेल, असे सांगितले होते. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी त्यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत बैठक केली.

नवी मुंबई महापालिका महापालिका मुख्यालयाजवळ गेले १३ दिवस विशिष्ट मागण्यांकरिता (साफसफाई कर्मचारी) आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रश्नांबाबत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमोर मांडल्या. त्यावर आयुक्त नार्वेकर यांनी सकारात्मकता दाखवत साफसफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न लवकरात लवकर सोडवू, असे त्यांनी सांगतले. तसेच ५ साफसफाई कर्मचारी जे मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना देखील त्यांच्या जागेवर नियुवती देण्यात येईल, असेही आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

सर्व साफसफाई कर्मचारी गोरगरीब आणि विविध समाजातील कर्मचारी असून ते आपआपले कर्तव्य बजावत आहेत. याच साफसफाई कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेमध्ये पारितोषिके मिळत असून साफसफाई कर्मचाऱ्यांमुळेच नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पण, त्याचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. त्यामुळे साफसफाई कर्मचारी त्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी गेली १३ दिवस उपोषणाला बसले असून त्यांना न्याय देण्याचे कर्तव्य लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे आहे. त्यामुळे या सफाई कामगारांची व्यथा महापालिका आयुवतांसमोर मांडल्यानंतर आयुवतांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेने पटकाविले