पनवेल मधील विकास कामांचा महापालिका आयुवतांकडून आढावा

हद्दीतील कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या आयुवत गणेश देशमुख यांच्या सूचना

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य अभियंता जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, लेखा परीक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्या सह महापालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शवविच्दछेदन गृहासाठी जागा मिळण्याबाबत ‘सिडको'कडे पाठपुरावा करणे, महापालिका हद्दीतील ५७ बाजार विकसित करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करणे, ‘सिडको'कडील भूखंड हस्तांतरण करणे, महापालिका हद्दीत कत्तलखाना बांधणे, महापालिका क्षेत्रातील बेवारस वाहनांवर कारवाई करणे, महापालिका हद्दीतील सर्व उड्डाणपुलांचे सौंदर्यीकरण करणे, माताबाल संगोपन केंद्र , वॉटर मिटर बसविणे, आदि कामांचा आढावा घेऊन कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी विभागप्रमुखांना यावेळी दिल्या.

शाळांसाठी हस्तांतरीत झालेल्या भूखंडावर शाळा बांधणे, कळंबोली येथे महापालिकेचे रुग्णालय सुरु करणे,  विविध तलावांचे सुशोभिकरण करणे, अशा विविध कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेऊन त्या त्या विभागांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचनाही दिल्या.

महापालिका हद्दीमध्ये बेवारस वाहनांवर कारवाई...
महापालिका हद्दीमध्ये चारही प्रभागांमध्ये सध्या बेवारस वाहनांवर कारवाई सुरु आहे. विभागप्रमुखांच्या बैठकित या कामाचा आयुक्त गणेश देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी चारही प्रभागांमध्ये आत्तापर्यंत १२५ वाहनांवर बेवारस वाहनांची नोटीस लावण्यात आली असून यापैकी सुमारे ७४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या जप्त वाहनांपैकी ९ संबंधित वाहनांच्या मालकांनी दंड भरुन आपली वाहने नेली असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी यावेळी दिली.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने यावर्षी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घेतली होती. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी  केली होती. यावर्षी महापालिकेने कृत्रिम तलावांमध्ये वाढ केली होती. तसेच अभिनव मुर्तीदान सकंल्पना नियोजनपूर्वक राबविली. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या संकल्पनेचा स्वीकार करून, महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त देशमुख यांनी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम यशस्वीपणे राबविल्याबद्दल अभिनंदन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर महापालिका सकारात्मक