नवी मुंबई शहरातील हवा प्रदूषणात वाढ

‘स्वच्छ हवा माझा अधिकार' मोहीमेला भरघोस प्रतिसाद

वाशी : आजवर प्रदूषित हवेत दिल्ली शहर आघाडीवर राहत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात रात्री सोबतच पहाटे देखील धुक्याची चादर पसरत असून, दर्प वास येत आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत नवी मुंबई शहर दिल्ली शहराशी स्पर्धा करु लागले असून, हवेची गुणवत्ता ३०० एक्युआय पार करत आहे. ३०० एक्युआय हवा आरोग्यास अति खराब आहे, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

नवी मुंबई शहरात मागील एक महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी वाढत असून, हवा गुणवत्ता ढासळत चालली आहे. नवी मुंबई शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्युआय पेक्षा अधिक आढळत आहे. मात्र, नवी मुंबईशहरात रात्री बरोबरच आता सकाळी देखील हवेत मोठ्या प्रमाणावर धुके दिसत असून, या धुवयाला उग्र दर्पवास येत आहे. याशिवाय नवी मुंबईर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नवी मुंबई शहर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले जात असून, आता दिल्ली शहरातील हवा प्रदूषणाशी जणू स्पर्धाच करु लागल्याचे चित्र दिसत आहे. १३ ऑवटोबर पासून नवी मुंबई शहरात सकाळी देखील  हवेत धूलिकण दिसत आहेत. जणू थंडीच पडत असून, धुरकट वातावरण निर्मिती होत आहे. याचा प्रत्यय सकाळी वाशी सेवटर-२६, २८ मधील नागरिकांना सकाळी चालायला जात असताना आला आहे. मात्र, सदर धुक्यातून दर्प वास येत असल्याने मळमळ वाटते. १४ ऑवटोबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांकात नवी मुंबईशहरातील हवा अतिखराब नोंदविण्यात आलेली आहे. ‘सफर इंडिया'च्या  नोंदीनुसार नवी मुंबई शहरात सर्वाधिक प्रदूषित हवा वाशी आणि नेरुळ मध्ये नोंदविण्यात आली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० एक्युआय पार होता.


‘स्वच्छ हवा माझा अधिकार' मोहीमेला भरघोस प्रतिसाद
वाशी सेक्टर-२६, २८ परिसरात हवा प्रदूषण नित्याचेच झाले असल्याने येथील रहिवासी बेजार झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांना शुध्द हवा मिळावी, याकरिता मागील रविवार पासून ‘नवी मुंबई अधिष्ठान' मार्फत प्रत्येक रविवारी ‘स्वच्छ हवा, माझा अधिकार' मोहीम सुरु करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर रोजी देखील या मोहीमेला भरघोस प्रतिसाद लाभला असून, यावेळी स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली. या मोहीमेत शेकडो रहिवाशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मधील विकास कामांचा महापालिका आयुवतांकडून आढावा