आदिशक्ती मातेची मंदिरे बनली भाविकांचे श्रध्दास्थान

उरण मधील मंदिरांना जत्रेेचे स्वरुप

उरण : उरण शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून अनेक भाविक कुटुंबासह ग्रामदैवतांच्या आणि देवी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत. सध्या उरणमधील मंदिरे भाविकांची श्रध्दास्थाने बनली आहेत.

शारदीय नवरात्र देवी दुर्गामातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक सण आहे. उरण तालुक्यात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सध्या तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जसखार गांवची ग्रामदेवता श्री रत्नेर्श्वरी देवी, फुंडे गांवची ग्रामदेवता श्री घुरबादेवी, नवीन शेवा गांवची ग्रामदेवता श्री शांतेर्श्वरी देवी, डोंगरी गांवची ग्रामदेवता श्री अंबादेवी, उरण देऊळ वाडीची ग्रामदेवता श्री उरणावंती-शीतला देवी, करंजा गावची ग्रामदेवता श्री द्रोणागिरी देवी, मोरा कोळीवाडा गावची ग्रामदेवता श्री एकवीरा देवी, नागांवची ग्रामदेवता श्री मांगिन देवी, चिरनेर गांवची ग्रामदेवता श्री गावदेवी माता, कोप्रोली गांवची ग्रामदेवता श्री वज्रेश्वरी देवी, कोटगावची ग्रामदेवता श्री जरीमरी देवी, बोरखार गांवची ग्रामदेवता श्री गावदेवी, कंळबुसरे गावची ग्रामदेवता श्री इंद्रायणी एकवीरा देवी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने नवरात्रौत्सव सण साजरा केला जात आहे.

नवरात्रौत्सव सणाचे औचित्य साधून तालुक्यातील तसेच इतर शहरातील, ग्रामीण भागातील भाविक मोठ्या भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी मंदिरात कुटुंबासह येत असल्याचे चित्र मंदिर परिसरात पाहायला मिळत आहे. यावेळी सुहासिनी महिला आपल्या ग्रामदैवत असलेल्या श्री दुर्गा देवीची खणा नारळानी ओटी भरत आहे. त्यामुळे मंदिरे भाविकांची श्रध्दास्थाने बनली असून मंदिर परिसराला सध्या जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ