सानपाडा सेवटर-१० मधील पाणी समस्या निकाली
नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु
वाशी : सानपाडा सेक्टर -१० मधील सिडको वसाहत तसेच खाजगी सोसायटी आणि रो हाऊस परिसरात मागील काही वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी समस्येने ग्रासले होते. त्यामुळे या परिसरात २५० व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकून ती जलवाहिनी मुख्य वाहिनी बरोबर जोडण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे शिवसेना शाखा प्रमुख विसाजी लोके यांनी केली होती. तसेच मागणीचा पाठपुरावा विसाजी लोके यांनी सातत्याने केला होता.
अखेर विसाजी लोके यांच्या मागणीला यश आले असून, महापालिका मार्फत सानपाडा सेक्टर -१० मधील सिडको वसाहत, खाजगी सोसायटी आणि रो हाऊस या भागात २५० व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या भागातील पाणी समस्या निकाली निघणार आहे.