आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा होणार
नवरात्रोत्सव शुभदिनी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबईतील सुमारे ३०० वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून किल्ले गांवठाण येथील आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिध्द आहे. तसेच नवी मुंबईच्या नावलौकीकाला साजेशा आणि चिमाजी अप्पांपासून ३००हुन अधिक वर्षाच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या आई गोवर्धनी माता मंदिर आहे.
नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी आई गोवर्धनी मातेची जनमानसात ख्याती आहे. आई गोवर्धनी माता मंदिर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून तसेच या पुरातन मंदिराच्या जीर्णोध्दार १५ वर्षापूर्वी उद्योजक विजय नारायण म्हात्रे आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे शुभहस्ते करण्यात आला होता. आई गोवर्धनी माता मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव घटस्थापना होणार आहे.
आई गोवर्धनी माता मंदिरात १५ आवटोबर रोजी सकाळी ७ उद्योगपती योगेश विजय म्हात्रे आणि सौ. नमिता योगेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते आई गोवर्धनी मातेचा अभिषेक-पुजा होणार आहे. नवरात्रौत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता आईची पुजा-र्चा होणार आहे. तसेच
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, *शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता संकल्प महिला मंडळ नवी मुंबई यांच्या वतीने ‘भोंडला-पारंपारिक देवीची गाणी', सायंकाळी ५ वाजता ‘हळदी कुंकू' चा कार्यक्रम होणार आहे. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आईचा ‘नवचंडी होम' आणि दुपारी १ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. या नवरात्रोत्सव शुभदिनी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे आमंत्रण आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
दरम्यान, ज्या भाविक भक्तांना देवीचा अभिषेक करावयाचा आहे त्यांनी नाव नोंदणीकरिता सुधीर शेट्टी (७७३८७२९२५८), हेमंत कोळी (९१६७३०२८२७) यांच्याशी संपर्क साधावा.