कार्ला गडावरील श्री एकविरा देवी मंदिरात आज घटस्थापना

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त

वाशी : महाराष्ट्र राज्यातील तमाम आगरी, कोळी, सिकेपी यांसह विविध समाजाची आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिरात ‘श्री एकवीरा देवी देवस्थान प्रशासकीय समिती' तर्फे नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज अश्विन शुवल प्रतिपदा, १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करुन एकविरा देवी मंदिरात नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात आज १५ ऑवटोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव मधील नऊ दिवसात एकविरा देवी मंदिरात दैनंदिन अभिषेक सह, ललित पंचमी, सरस्वती आवाहन, महालक्ष्मी पूजन, दुर्गाष्टमी उपवास, असे कार्यक्रम पार पडणार आहेत. तर अश्विन शुध्द नवमी दिनी २३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता महानवमी होमहवन करण्यात येणार आहे. या होमाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गडावर येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कार्ला गडावर आणि पायथा परिसरात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, कार्ला गडावर येणाऱ्या भक्तांनी शांततेत एकविरा देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री एकवीरा देवी देवस्थान प्रशासकीय समिती मार्फत करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पामबीच मार्गावरील डिजिटल वेग मर्यादा फलक बंद