उरण आगारात बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान संपन्न

उरण डेपोचे प्रबोधनकारी उपक्रम इतर डेपोंना आदर्श ठरावेत -प्रा. एल. बी. पाटील

उरण : उरण येथे बस स्थानकाची बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ सुंदर बस स्थानक तपासणी अभियान मार्फत नुकतीच शासकीय आणि सामाजिक प्रतिनिधी द्वारा करण्यात आली. याप्रसंगी रायगड विभाग नियंत्रक दिपक घोडे, विभागीय अधिकारी सुहास कांबळे, रायगड विभाग उपमंत्री अभियंता चेतन देवधर, रायगड सांख्यिकी अधिकारी प्रियंका बुधवंत, मुंबई विभागीय अधिकारी अमोल चौगुले, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ'चे सदस्य रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, ‘कोकण प्रवासी संघ'चे रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहणीमध्ये उरण बस स्थानक अतिशय लक्षणीय वाटले. काही वर्षापासून प्रवासी वाहतूक सोय, कर्मचाऱ्यांचा सामाजिक सुसंवाद, प्रवाशांसाठी प्राथमिक पाणी, बैठक व्यवस्था, प्रवाशांसाठी होणाऱ्या सूचना, मैदानाचा काही भाग वगळता साफसफाई प्रसन्न वाटल्याचे काही तपासनीस आणि प्रवासी यांनी चर्चा करताना सांगितले.

आगार व्यवस्थापक आणि आगार कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांसाठी होणारे प्रबोधनकारी उपक्रम इतर डेपोंना आदर्श ठरावेत असे असल्याचे मत रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील यांनी व्यक्त केले. ‘द्रोणागिरी स्पोर्टस्‌'चे अध्यक्ष महादेव घरत यांनी उरण आगार सुशोभिकरणात महत्वाचा भाग घेतल्याबद्दल व्यवस्थापक माचले यांनी घरत यांचे विशेष आभार मानले.
यावेळी डेपो व्यवस्थापक सतीश मालचे, वाहतूक निरीक्षक अमोल दराडे, दिनेश कदम, डी. पी. पाटील, तानाजी भोईर, धनंजय पाटील आणि कर्मचारी यांचा सहभाग प्रसंशनीय वाटला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे वाशी सेक्टर-२६ परिसरात रात्री पाहणी