प्रभाकर नाडकर्णी यांना देवाज्ञा

ज्येष्ठ वास्तुरचनाकार प्रभाकर नाडकर्णी यांचे निधन

नवी मुंबई : नवी मुंबईतील ज्येष्ठ वास्तुरचनाकार प्रभाकर शंकर नाडकर्णी यांचे १० ऑवटोबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटवयाने निधन झाले. वाशी येथे वास्तव्यास असणाऱ्या नाडकर्णी यांना आंघोळ करतानाच हृदयविकाराचा झटका आला.

नाडकर्णी यांनी इंग्लंडमधील रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ ब्रिटीश आर्किटेवचर येथून इंटिरियर डिझायनिंग मधील पदवी संपादन केली होती. १९७४ च्या सुमारास त्यांनी सिडकोमध्ये काम करताना तारापूर, नाशिक येथील प्रकल्पांची जबाबदारी सांभाळली होती. वाशीमधील ॲबट होटेल, तुर्भ्याचे आय अहमद कोल्ड स्टोरेज, वाशीचे शिव विष्णू मंदिर, बालाजी मंदिर, सानपाडा येथील दत्त मंदिर, अन्नपूर्णा महिला मंडळ, वाशी, नेरुळचे शनैश्वर मंदिर, सीबीडीचे नर्मदा निकेतन आदिंचे डिझाईन त्यांनीच बनवले होते. १९७५-७६ च्या सुमारास नवी मुंबई शहरी सेना स्थापन करुन त्यांनी येथील सामाजिक कार्यातही योगदान दिले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठीही त्यांनी काम केले होते. नाडकर्णी यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेत असल्याने ते तिकडून नवी मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे