पनवेल महापालिकेचा कचरा आदई-नेवाळीच्या जागेत

अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडमुळे कचऱ्याला दुर्गंधी

नवीन पनवेल : पनवेल महापालिकेचा कचरा आदई-नेवाळीच्या जागेमध्ये टाकला जात असल्याचा आरोप केला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा येथे टाकला जात असल्याने या कचऱ्याला मोठी दुर्गंधी सुटली आहे.

पनवेल महापालिकेचा कचरा तळोजा परिसरात टाकण्यात जातो. मात्र, परिसरात अनधिकृतपणे विविध ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड तयार केले जात आहेत. तालुक्यातील आदई-नेवाळी येथील जागेमध्ये अनधिकृतपणे पनवेल महापालिका हद्दीतील कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. पावसामुळे सदर कचरा कुजून त्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तोंडावर कपडा ठेवावा लागत आहे.

सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या गाड्या येऊन कचरा डम्पिंग केला  जातो. पनवेल महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच कचराटाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा!