वाहतुकीच्या नियमांना बगल

खारघर मध्ये ९ महिन्यात २० हजार वाहनांवर कारवाई

खारघर : वाहन चालकानी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे याविषयी जनजागृती करुनही वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे  दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहतुक पोलीस विभागाने कंबर कसली असून, खारघर वाहतुक पोलीस विभागाने गेल्या ९ महिन्यात २० हजारांपेक्षा अधिक वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. अनेक वाहनांची नंबर प्लेट, ट्रिपलसिट, विना लायसन्स अशा अनेक कारणांनी वाहतुक पोलिसांनी वाहनांवर कारवाया केल्या आहेत. या कारवाईत १ कोटी ८८ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

खारघर परिसरात वाहतुक पोलीस विभागाकडून वारंवार वाहतुक नियमांची जनजागृती केली जाते. दरम्यान, शासनाने दंडाची रक्कम दुप्पटीने अधिक केली असूनही नागरिक वाहतुक नियमांची अंमलबजावणी करीत नाहीत. तसेच अपघात टाळण्यासाठी अणि लोकांना नियमांची जाणीव व्हावी, या करिता वाहतुक पोलीस नियंत्रण विभाग तर्फे नागरिकांनी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात येते. यानंतर देखील वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या २० हजारांपेक्षा अधिक वाहन धारकांवर गेल्या ९ महिन्यात कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत १ कोटी ८८ लाख रुपये दंड शासन तिजोरीत जमा झाला आहे.

खारघर मध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच अवैध आणि मद्यप्राशन करुन, विना हेल्मेट, विना परवाना वाहन चालविणाऱ्या २० हजारापेक्षा अधिक वाहन चालकांवर गेल्या ९ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ऑनलाईन १ कोटी ८८ लाख रुपये दंड थोटावण्यात आला असून, ४८ लाख रुपये रवकम रोख स्वरुपात दंड वसुल करण्यात आला आहे. - संतोष काणे, वाहतुक पोलीस अधिकारी - खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘शिवशौर्य यात्रा'चे वाशीमध्ये जोरदार स्वागत