‘आयुष्मान भव' आरोग्य मेळाव्यात ३१३७ व्यक्तींची आरोग्य तपासणी ​​​​​​​

नागरी आरोग्य केंद्रांवर ‘आभा कार्ड'ची निर्मिती, उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा

नवी मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘आयुष्मान भव' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सदर मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून दर शनिवारी आयुष्मान आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान भव आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी क्षयरोग, कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्य आजार याविषयी महापालिकेची रुग्णालये तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यामध्ये सफाई मित्र, क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची, मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत एक्सरे तपासणी, रक्तदाब, ँत्दद्‌ एल्ुीी, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी आरोग्य  कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी शिबीर आयोजित करुन बांधकाम मजुरांची तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सुमारे ३१३७ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरांवर ‘आभा कार्ड'ची निर्मिती आणि अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

३० सप्टेंबर रोजीच्या आरोग्य मेळाव्यास नागरिकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर आता ७ ऑक्टोबर रोजीच्या आरोग्य मेळाव्यामध्ये सर्व गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मेळाव्यास नागरिकांनी असाच मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका तर्फे तृतीय पंथीयांकरिता कोपरी मध्ये विशेष शौचालय