पोलीस चौकी होतायेत लुप्त

गुन्हेगारी रोखणार कशी ?

उरण ः उरण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या पोलीस चौक्या वापराविना पडून आहेत. तर समुद्र,  खाडीकिनारी ठेवण्यात आलेल्या कंटेनरची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या चौक्या या नवी मुंबई पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे अडचणीच्या विळख्यात सापडलेल्या आहेत.

मुंबई शहरावर अतिरेकी हल्ला समुद्र मार्गाने झाला होता. त्यामुळे मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने बोकडविरा, दिघोडे, दिघाटी, घारापुरी, उलवे या नाक्यांवर पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. तसेच पिरवाडी चौपाटी, वशेणी या समुद्र,  खाडीकिनारी कंटेनर मध्ये पोलीस चौक्या उभारल्या आहेत. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांकडे नवी मुंबई पोलीस यंत्रणेला लक्ष केंद्रित करण्यास वेळ न मिळत नसल्याने आज सदर पोलीस चौक्या लुप्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखणार कशी? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आयुष्मान भव' आरोग्य मेळाव्यात ३१३७ व्यक्तींची आरोग्य तपासणी ​​​​​​​