पनवेल महापालिका आरोग्य सेवेत ४ शववाहिनी दाखल

पनवेल महापालिकेने प्रत्येक प्रभाग समिती साठी एक याप्रमाणे चार शववाहिनीची खरेदी

पनवेल ः पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी चार शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबर रोजी या शववाहिनींचा लोकार्पण सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आमदार प्रशांत ठाकूर, ‘नगरपरिषद प्रशासन'चे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त वैभव विधाते, लेखा परीक्षक निलेश नलावडे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वेळेत शववाहिनी उपलब्ध न झाल्याने अनेकदा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याशिवाय आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगरसेवक यांनीही महापालिकेने प्रत्येक प्रभाग समिती साठी एक शववाहिका खरेदी करावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे नागरिकांच्या समस्या लक्षात घ्ोऊन पनवेल महापालिकेने प्रत्येक प्रभाग समिती साठी एक याप्रमाणे चार शववाहिनीची खरेदी केली असून आता त्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायू प्रदूषणावर महापालिकेचा धूळ शमन यंत्राचा उतारा