रबाळे मधील पदपथांवर उद्योजकांचा कब्जा

एमआयडीसी, महापालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष; नागरीकांना नाहक त्रास

नवी मुंबई ः रबाळे एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनेक कंपनी, उद्योजकांनी त्यांच्या कंपनी मधील सामान, मोठमोठ्या मशीन, पत्रे, अवजड वस्तू पदपथांवर,  रस्त्यांवर टाकून रस्ते आणि पदपथ काबीज केले आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांच्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. याशिवाय कंपन्यांमधील कामगारांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रबाळे एमआयडीसी मधील अनेक उद्योजकांनी वाढीव बांधकामांसह पदपथ देखील काबीज केले असल्याचे चित्र दिसत आहे. रबाळे एमआयडीसी मधील पदपथांवर, रस्त्यांवर सामान ठेवणाऱ्या मुजोर उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नसून, सदर उद्योजक स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ते, पदपथांवर इमारत बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण करत आहेत. रबाळे एमआयडीसी मधील रस्ते, पदपथावर विटा, रेती, भुसा, खडी, दगड, सिमेंट टाकून पदपथ काबीज करण्यात आल्याचे चित्र दिसते. मात्र, याकडे नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग आणि  एमआयडीसी अतिक्रमण विभागाचे अधिकारी वारंवार माहिती देऊनही जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रबाळे एमआयडीसी मधील पदपथांवर, रस्त्यांवर अतिव्रÀमण करण्यात आल्याने कंपनीतील कामगारांना, पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

रबाले एमआयडीसी भागातील पदपथ आणि रस्ते अतिक्रमण करुन काबीज केलेल्या उद्योजकांवर, कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अतिव्रÀमण हटाव कारवाईवेळी पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी मागणी केली आहे. ‘गणेशोत्सव'मुळे अतिक्रमण हटाव कारवाईला विलंब झाला आहे. मात्र, येत्या काही दिवसातच पोलीस संरक्षण मिळाल्यावर पदपथ आणि रस्त्यावर अतिव्रÀमण करणाऱ्या  कंपन्यांना नोटीसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. - अशोक सावकार, अतिक्रमण विभाग अधिकारी - एमआयडीसी, महापे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका आरोग्य सेवेत ४ शववाहिनी दाखल