वाहतूक पोलिसांची कार्यतत्परता !

जुईनगर येथून जेएनपीटी येथे जाणाऱ्या एनएमएमटी बसच्या चाकाने घेतला अचानक पेट

नवी मुंबई ः ‘एनएमएमटी'च्या बसेसना आग लागण्याचे प्रकार थांबतच नाही. ऐरोली येथे एनएमएमटी ई-बसने पेट घ्ोतल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना घडली असतानाच त्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ ऑवटेाबर रोजी देखील जुईनगर येथून जेएनपीटी येथे जाणाऱ्या एनएमएमटी बसच्या चाकाने अचानक पेट घ्ोतल्याची घटना नेरुळ येथे घडली. यावेळी तुर्भे वाहतूक शाखेतील पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून एनएमएमटी बसच्या चाकाला लागलेली आग तात्काळ विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा या बसने देखील पेट घ्ोतला असता. दरम्यान, सदर दुर्घटनेवेळी वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

नवी मुंबई महापालिकेची जुईनगर ते जेएनपीटी येथे जाणारी एनएमएमटी बस (श्प् ४३ ँX ०३९१) ३ ऑवटोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एल. पी. ब्रिज सिग्नल येथे आल्यानंतर सदर बसच्या डाव्या बाजुच्या पुढील चाकातून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे चालक किरण फणसे याने तात्काळ बस त्याच ठिकाणी थांबवली. सदर बसचे पुढील चाक गरम होऊन त्याने पेट घ्ोतल्यामुळे धूर येत असल्याचे तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तात्काळ बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी वाहतूक पोलिसांच्या गाडीमध्ये असलेल्या अग्निशमन सिलेंडरच्या सहाय्याने स्वतः एनएमएमटी बसच्या चाकाला लागलेली आग विझवली. त्यानंतर बस चालक फणसे याने सुध्दा त्यांच्याकडे असलेल्या अग्निशमन सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर सदरची बस बाजुला घ्ोऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग पूर्णपणे विझल्याची खात्री केली.
दरम्यान, तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, पोलीस हवालदार पोळ, भोसले, घोरपडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल काचगुंडे यांनी कार्यतत्परता दाखवून एनएमएमटी बसच्या चाकाला लागलेली आग तात्काळ विझविल्यामुळे पुढील अनर्थ टाळला. अन्यथा सदर बसने पेट घ्ोतला असता. सदर दुर्घटनेवेळी वाहतूक पोलिसानी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रबाळे मधील पदपथांवर उद्योजकांचा कब्जा