पनवेल रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांकांचे पुनर्नंबरीकरण

‘मध्य रेल्वे'तर्फे पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडलिंगचे कामासाठी विशेष ब्लॉक

पनवेल : पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडलिंगचे काम पाहता ‘मध्य रेल्वे'ने पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पनवेल स्टेशनवर अप आणि डाऊन मार्गावर हार्बर लाइन्स आणि नॉन-इंटरलॉकिंगसह विद्यमान अप आणि डाऊन हार्बर लाइन्स जोडण्यासाठी तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अप आणि डाऊन २ नवीन मार्गिकांच्या बांधकामाच्या सोयीसाठी पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडलिंगचे काम करण्यात आले आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाऊन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडलिंग कामासाठी पनवेल रेल्वे स्थानकात ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ३८ तासांचा टॅ्रफिक ब्लॉक घेण्यात आला होता.  

पनवेल उपनगरीय यार्ड रीमॉडलिंगचे काम पाहता ‘मध्य रेल्वे'ने पनवेल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुन्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या जागी नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येणार आहे. तसेच जुना प्लॅटफॉर्म क्रमांक २ नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक २ असेल (अपरिवर्तित), तसेच जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक १ ने बदलला जाणार आहे. तर जुना प्लॅटफॉर्म क्रमांक ४ पाडून तो कायमचा बंद (प्लॅटफॉर्म नाही) केला जाणार आहे. दरम्यान, प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन ‘मध्य रेल्वे' प्रशासनाने केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळीपूर्वी ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन करण्याची मागणी