ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल 

ऐरोली काटई मार्गावरील गर्डर टाकण्याच्या कामासाठी ऐरोली-मुलुंड उड्डाणपुलावरील वाहतुकीत बदल 

नवी मुंबई : ऐरोली-काटई या पुलाच्या बांघकामातील ऐरोली मुलुंड वाहीनीवरील पुलाचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असुन ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान रात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत या पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे या चार दिवसाच्या कालावधीत रात्रीच्या सुमारास ऐरोली येथुन मुंबई, ठाणे, मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड वाहनांना या मार्गावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधित जड अवजड वाहनांची वाहतुक महापे, शिळफाटा, मुंब्रा मार्गे वळविण्यात आली आहे. 

ऐरोली-काटई या पुलाच्या कामातील ऐरोली-मुलुंड वाहीनीवरील पुलाचे गर्डर रात्रीच्या कालावधीत टाकण्यात येणार आहे. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम निर्विघ्नपणे पुर्ण व्हावे, तसेच नागरिकांना व वाहन चालकांना येजा करणे सोयीचे व्हावे, यासाठी  ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान रात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत मुलुंड, ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पुर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. यादरम्यान, ऐरोली ब्रीजवरुन मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना महापे -शिळफाटा मार्गे मुंब्रा, ठाणे मार्गे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे येथुन ऐरोली मार्गे नवी मुंबईत येणाऱ्या वाहनांना वाशी खाडी पुलावरून अथवा मुंब्रा बायपास शिळफाटा मार्गे नवी मुंबईत इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला या आहे. याबाबतची अधिसुचना नवी मुंबई वाहतुक विभागाने जारी केली आहे.  

या अधिसूचनेतून अवजड वाहना व्यतिरिक्त इतर वाहने तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे. वाहन चालकांनी ऐरोली खाडी पुलावरील वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपली वाहने चालवावीत. असे आवाहन नवी मुंबई वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लिबू आवक मध्ये घट ; दरात वाढ