पनवेल महापालिकेचा ७वा वर्धापन दिन संपन्न

२०३१ पर्यंत पनवेल महापालिका अतुलनीय प्रगती करेल -आयुवत देशमुख

पनवेल : पनवेल महापालिकेचा सातव्या वर्धापन दिन सोहळा १ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी महापालिका आयुवत गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अतिरिवत आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय जगताप यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी सत्यनारायण आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहा वर्षात महापालिकेने केलेल्या कामांमध्ये बांधकाम विभागाचा मोठा वाटा आहे. सन २०२५ पर्यंत महापालिकेचे कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालेल, अशी अपेक्षा आहे. २०५२ पर्यंत पनवेल कार्यक्षेत्रात पाणी टंचाई भासणार यासाठी महापालिका नियोजन करत आहे. यावेळी महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांनी यावेळी केला. तसेच सदर सर्व कामे शहरवासियांना समर्पित आहे असे सांगून सन २०३१ पर्यंत पनवेल महापालिका अतुलनीय प्रगती करेल, असा विश्वासही आयुवत देशमुख यांनी व्यक्त केला.

यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी चार प्रभागांसाठी खरेदी केलेल्या ४  शववाहिका पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी महापालिका हद्दीत मोफत देण्याची घोषणा केली.

तर पनवेल महापालिकेची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. एमएमआर झोनमधील इतर भागांच्या तुलनेत पनवेल महापालिका उत्तम सुविधा देत आहे. येत्या काळात पनवेलचा पहिल्या पाच राहण्यायोग्य शहरांमध्ये समावेश होईल, अशी अपेक्षा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमामध्ये वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा-युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड आणि पनवेल महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपायुक्त कैलास गावडे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेला अल्पावधीतच यशस्वीतेच्या शिखरांवर नेले असे सांगून, यश म्हणजे काय तेे आयुक्तांनी आपल्या कामातून दाखविल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांनी केले. यावेळी महापालिकेच्या वतीने ‘सुरमई शाम' असा सांस्वृÀतिक कार्यक्रम संपन्न झाला.


दरम्यान, यावेळी ‘माझा देश माझी माती' उपक्रमा दरम्यान महापालिकेने विविध विभागातून आणलेले अमृत कलशाचे शहरस्तरीय माती संकलन करण्यात आले. सदर माती संकलन केलेला कलश दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये १४८ ठिकाणी स्वच्छता मोहीम संपन्न