बेपत्ता ज्येष्ठाची ज्येष्ठ नागरिक दिनी घडवली कुटुंबियांशी पुनर्भेट

 रबाळे येथे आढळून आलेले मुलुंडचे ज्येष्ठ नागरिक पुन्हा त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द

 नवी मुंबई : मुलुंड येथे रहिवासी असणारे प्रकाश शिंदे ज्येष्ठ नागरिक बुधवार २७ सप्टेंबर पासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या परिवाराने त्यांना शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पोलीस तक्रारही दाखल केली. परंतु प्रयत्न नाही यश येत नव्हते. नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट या नाका कामगारांसाठी कार्यरत संस्थेच्या कार्यकत्यांच्या दक्षतेमुळे त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी पुनर्भेट घडवून आणण्यात आली. याबद्दल प्रभात ट्रस्टचे कौतुक होत आहे.

देशभरामध्ये स्वच्छता अभियान १ ऑवटोबर रोजी राबविले गेले. एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट या नाका कामगारांसाठी कार्यरत संस्थेच्या वतीने नाका कामगारांच्या निवारा शेडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रभातचे स्वयंसेवक सकाळी साडेआठ वाजता रबाळे रेल्वे स्थानकाजवळील कामगार नाक्यावर पोहोचले होते. स्वच्छता अभियानात सहभागी झालेले जीवन निकम यांनी या ठिकाणी रात्री निवाऱ्याला असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाशी चर्चा केली. त्यातून ते घरातून हरविले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा व्हिडिओ मिसिंग हेल्पलाइनवर देऊन पोलिसांच्या मदतीने त्याचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. १ तारखेच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रबाळे पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक रोहन वैती व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी कुलकर्णी, दवणे व भोसले यांच्या पथकाने तत्परतेने शोध मोहीम राबविली. मुलुंड स्थानकात दाखल झालेल्या मिसिंग तक्रारीच्या आधारे त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून या ज्येष्ठ नागरिकाची पुनर्भेट घडवून आणली. या भेटीनंतर त्यांचे नातू कार्तिक बनसोडे यांनी प्रभात टीमशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेचा ७वा वर्धापन दिन संपन्न