पनवेलजवळ मालगाडीचे डब्बे घसरले

लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाडयाची वाहतुक ठप्प 

नवी मुंबई : पनवेल येथून वसई येथे अवजड लोखंडी कॉईल घेऊन जाणारी मालगाडी पनवेल जवळ शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रुळावरुन घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मालगाडीचे 5 ते 6 बोग्या रुळावरुन खाली उतरल्यामुळे लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाडयाच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडुन सदर मार्गावरुन जाणा-या एक्सप्रेस गाडया दुस-या मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाडया वेगवेगळ्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्याने यातून प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले आहेत.  

या अपघातातील मालगाडी शनिवारी दुपारी पवनेल येथून अवजड लोखंडी कॉईल घेऊन वसईच्या दिशेने जात होती. सदर मालगाडी कळंबोली ते पनवेल या स्टेशनच्या दरम्यान आली असताना, या मालगाडीचे 5 ते 6 बोग्या रुळावरुन घसरुन त्यावरील अवजड लोखंडी कॉईल खाली कोसळल्या. या मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी एक्सप्रेसची वाहतूक पुर्णपणे ठफ्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन माल गाडीवरील लोखंडी कॉईल बाजूला काढून मालगाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्याच्या तसेच रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. या अपघातानंतर या मार्गावरुन जाणाऱया गोरखपुर-पनवेल एक्सप्रेस कळंबोली, मंगळुरु एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी, इंदूर एक्प्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस आदी गाडया वेगवेगळ्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या अपघाताचा उपनगरीय लोकल सेवेला कोणताही फटका बसलेला नसून ही सेवा सुरळीतपणे सुरु आहे.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 स्वच्छता ही सेवा उपक्रम!