पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात गणपतींना निरोप

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजन बध्दरित्या दहा दिवसाच्या गणपतींना निरोप

पनेवल: महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात  सुमारे सहा हजाराहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे भाक्तिमय  वातावरणात नियोजनबध्दरित्या  शांततेत दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

      माझी वसुंधरा ४.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणांचं पावित्र्य आणि पर्यावरणाचं भान राखलं जावं यासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली आहे. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी  केली होती.  याकामी विविध एनजीओ, विविध शाळांचे एनसीसी, एनएसएस चे विद्यार्थी महापालिकेला सहकार्य मिळाले. गणेशभक्तांच्या सोयी - सुविधांसाठी  पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग,पर्यावरण विभाग या 8 विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली होती.

       यावर्षी महापालिकेने  चारही प्रभागामध्ये एकुण 59 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सोय केली होती. यामध्ये पनवेलमध्ये  9 ठिकाणी ,खारघर मध्ये 37 ठिकाणी , कळंबोली प्रभागामध्ये 9 ठिकाणी ,कामोठेमध्ये 4 ठिकाणी भक्तांना गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. याचबरोबर विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, विशेष तराफा निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली होती.

  यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्यावतीने प्रभाग समिती अ मध्ये 14 ठिकाणी, प्रभाग समिती ब मध्ये 5 ठिकाणी , प्रभाग क मध्ये 5 ठिकाणी , प्रभाग समिती ड मध्ये 2 ठिकाणी अशी 26 ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय नागरिकांना करून देण्यात आली होती. याचबरोबर महापालिका कार्यक्षेत्रातील 78 मोठ्या चौकांमध्ये मुर्तीदान व्यवस्था करण्यासाठी मोठा मंडप उभारून कर्मचाऱ्याची नियुक्ती केली होती. तसेच 300 पेक्षा जास्त फ्लॅट असणाऱ्या 36 सोसायट्यामध्ये तळमजल्यावरती मुर्तीदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे परिसरात ६४३५ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन