भास्कर मोकल यांच्या घरातील मखरास प्रथम क्रमांक

 पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेशोत्सव मखर स्पर्धा

उरण ः श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, महाराष्ट्र द्वारे उरण तालुक्यात पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेशोत्सव मखर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चिरनेर गावातील रहिवासी भास्कर मोकल यांच्या घरातील गणपतीच्या मखरास प्रथम क्रमांक म्हणून मोकल कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तथा ‘चिरनेर ग्रामपंचायत'चे माजी सदस्य पद्माकर मोकल यांना संस्थेकडून मानाची शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  
चिरनेर गावातील ‘उरण पंचायत समिती'चे माजी सभापती भास्कर मोकल यांचे कुटुंबीय विविध सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घ्ोत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोकल कुटुंबातील सदस्यांनी गणेशोत्सवात पर्यावरण पुरक मखर बनविण्यासाठी फक्त टाकाऊ कागद आणि पुठ्ठयाचा वापर करुन शिवकालीन किल्ल्याची हुबेहुब प्रतिवृÀती बनवली होती. त्यामध्ये शिवाजी महाराज यांच्या समाधीचा देखावा सजवून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती.सदर मखराची सजावट करण्यासाठी मोकल कुटुंबातील सदस्य भूषण मोकल, सचिन मोकल, सुरज मोकल, रोशन मोकल, रोहन मोकल, प्रसाद मोकल, प्रणित मोकल, आदेश म्हात्रे यांनी मेहनत घ्ोतली होती. मखरात ‘श्रीं'च्या मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणून चिरनेर कला नगरातील मुर्तीकार भालचंद्र हातनोलकर यांच्याकडून साकारण्यात आलेली शाडूच्या मातीपासून बनवलेली श्री गणेशाची सुंदर मुर्ती बसविण्यात आली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये रविवारी सकाळी १० वाजता ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन