पनवेल महानगरपालिकेचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी कर्मचाऱ्याच्या विविध स्पर्धेचे आयोजन
पनवेल: पनवेल महानगरपालिकेचा दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकारी कर्मचाऱ्याच्या विविध स्पर्धेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते.
या वेळी महापालिकेच्या दहा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेचे आयोजन लोकनेते दि.बा पाटील शाळेमध्ये करण्यात आले होते. तसेच अधिकारी व कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी नृत्य स्पर्धा व गायन स्पर्धेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड, शिक्षण विभाग प्रमुख किर्ती महाजन, सर्व शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध लोकगीतांवर नृत्य सादर करून प्रक्षकांचे मन जिंकले. तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाच्या रोजच्या ताणतणावातून थोडी विश्रांती घेत आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत गीत गायन व नृत्ये सादर केली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांनी पारंपारिक गीतांवर ठेका धरत नृत्य सादर केले.