पनवेल महानगरपालिकेच्यावतीने  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी आरोग्य मेळाव्याचे आयोजन

महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा : आयुक्त गणेश देशमुख

पनवेल :  प्रत्येक स्तरावरील  व्यक्तीला  केंद्र शासनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र शासनाने आयुष्यमान भव अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्यावतीने साप्ताहकि आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमांक 1 ते 6  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्तांनी केले आहे.

 या अभियानांतर्गत दिनांक 30 डिसेंबरपर्यंत महिन्यातल्या पहिल्या शनिवारी असंसर्गजन्य आजार यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, दुसऱ्या शनिवारी संसर्गजन्य यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही इत्यादींची तपासणी , तिसऱ्या शनिवारी माता बाल तपासणी ,  यामध्ये गरोदर माता, प्रसुती झालेल्या मातांची तपासणी करण्यात येत आहे. चौथ्या शनिवारी नाक, कान ,घसा, सिकलसेल, दंतरोग, उपशामक सेवा,नेत्ररोग, त्वचा आजार याबाबतची विशेष सत्रे या आरोग्य् मेळाव्यामध्ये घेण्यात येत आहे. या आरोग्य मेळाव्यामध्येच उपचार, संदर्भ सेवा याचबरोबर नागरिकांना आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी वितरण याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच अवयव दान शपथ, व नोंदणी, रक्तदान चळवळ विषयीची माहितीही यावेळी देण्यात येत आहे.

तसेच यामध्ये राज्य शासनाच्या महत्वकांक्षी  प्रकल्पांअंतर्गत  ‘निरोगी आरोग्य तरूणांचे, वैभव महाराष्ट्राचे या कार्यक्रमांतर्गत  महापालिकेच्यावतीने 18 वर्षावरील पुरुषांच्या सर्व तपासण्या होणार आहेत. यामध्ये हार्निया, किडनीस्टोन अशा विविध आजारांची तपासणी होऊन उपचार करण्यात येणार आहेत. याकरिता एएनएम व आशा वर्कर सर्वेक्षण करणार आहेत. नागरिकांना या सुविधेचा लाभ देण्याकरिता नागरिकांनी उत्स्फुर्तपणे त्यांना माहिती द्यावी असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड असणाऱ्या लाभार्थ्याला नोंदणीकृत रूग्णालयामध्ये काही ठराविक शस्त्रक्रियेमध्ये या  5 लाखांपर्यंतचे कव्हरेज मिळणार आहे. यासाठी नागरिकांनी आपले आयुष्यमान कार्ड काढणे महत्वाचे आहे. आयुष्मान कार्ड काढण्यासाठी पुढील लिंक्सचा वापर करावा.

वेब पोर्टल लिंक
https://beneficiary.nha.gov.in
मोबाईल ॲप्लीकेशन
https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
  ॲप द्वारे  KYC कसे करायचे त्याच्या व्हिडिओ ची लिंक

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभागातील शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीसाठी सहभाग घेण्याचे कोकण आयुक्तांचे आवाहन