सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर स्वच्छता पुरस्कारात प्रथम

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत जय भवानी मित्र मंडळ प्रथम

ठाणे : ठाणे महापालिका तर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा-२०२३'चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझादनगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण १६ मंडळांनी सहभाग घ्ोतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त आणि स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार किशोर नादावडेकर, सदाशिव कुलकर्णी आणि पत्रकार प्रवीण सोनावणे यांनी केले.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या ‘जय भवानी मित्र मंडळ'ने किन्नर समाजाचा आक्रोश त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी गुंतता हृदय असा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक एकविरा मित्र मंडळ, महागिरी कोळीवाडा यांच्या आनंद असावा सुमनापरी या देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (व्यसन मोबाईलचे मानवासाठी धोक्याचे) यांना चौथा, शिवसम्राट मित्र मंडळ, कोपरी (कचऱ्याचे वर्गीकरण) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, कोपरी (कोरोना) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक ओंकारेश्वर सार्वजनिक मित्र मंडळ, सावरकर नगर (वन संवर्धन) आणि आठवा क्रमांक शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर (पॉप्सीकल स्टिक आर्ट) यांना मिळाला आहे.

स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर यांना द्वितीय पारितोषिक जय भवानी सार्वजनिक उत्सव मंडळ, जय महाराष्ट्र नगर, तर तिसरा क्रमांक नवयुग मित्र मंडळ, पारशीवाडी यांना मिळाला आहे.

उत्कृष्ट मूर्तीकाराचे प्रथम पारितोषिक विनोद शिळकर (गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-कळवा), द्वितीय पारितोषिक दिपक गोरे (कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड), तृतीय पारितोषिक किशोर घोष्टीकर (श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, श्रीरंग सोसायटी) यांनी पटकाविले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये श्रीगणेशोत्सवात धार्मिक देखाव्यांवर भर