१ ऑवटोबर रोजी पनवेल महापालिकेचा ७ वा वर्धापन

महापालिका तर्फे छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन

पनवेल : पनवेल महापालिकेच्या सातव्या वर्धापनदिन निमित्ताने छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने  छायाचित्रण स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

पनवेल महापालिकेचा येत्या १ ऑक्टोबर रोजी सातवा वर्धापन दिन असून या निमित्ताने अधिकारी-कर्मचारी तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच खुल्या गटासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी छायाचित्रण स्पर्धेचे आयेाजन करण्यात  आले आहे.

या स्पर्धेत फक्त पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकच खुल्या गटातून सहभागी होऊ शकतात. एका स्पर्धकाने किमान तीन छायाचित्रे आपल्या अर्जासोबत ८ x १२ आकारातील रंगीत छायाचित्रांची प्रत्येकी एक फोटोप्रिंट पाठवावी. छायाचित्रे शक्यतो आडवी असावी, छायाचित्रे लॅमिलेशन केलेली नसावीत. या छायाचित्रांसोबत त्याची मूळ सॉपट कॉपी  [email protected] या संकेतस्थळावर पाठवावेत. स्पर्धकांनी छायाचित्रे पाठविताना छायाचित्रांच्या मागील बाजूस आपले नांव, संपर्कध्वनी, छायाचित्रणाचे स्थळ नमूद करावे. सदर बाब नमूद करताना छायाचित्र खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. छायाचित्रासोबत स्पर्धकांनी त्यांचे नाव, संपर्कध्वनी, पत्ता सर्व आपल्या अर्जामध्ये नमूद करावे. अर्धवट माहिती असणारे अर्ज स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धकांची छायाचित्रे नैसर्गिक असावीत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तांत्रिक फेरबदल अथवा कलाकुसर केलेली नसावी.

स्पर्धकांनी आपली छायाचित्रे २९ सप्टेंबर दुपारी १.३० पर्यंत महापालिका जनसंपर्क विभागामध्ये पाठविणे बंधनकारक राहील. यानंतर आलेल्या छायाचित्रे स्पर्धेमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही. स्पर्धेतील छायाचित्रांवर महापालिकेचे हक्क राहणार आहे. प्राप्त छायाचित्रे पनेवल महापालिकेची मालमत्ता असेल, भविष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा अधिकार पूर्णतः पनवेल महापालिकेचा असेल. या बरोबरच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल. विजेत्यांना १ ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन समारंभामध्ये पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

छायाचित्रण स्पर्धेचे विषयः
पनवेल महापालिकेचे प्रकल्प, उपक्रम
पनवेलचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा
पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास दर्शविणारी छायाचित्रे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ताकर वसुली उद्दिष्ट पूर्तीसाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश