नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छताविषयक राष्ट्रीय पातळीवर उपक्रमांची दखल

 रेकॉर्डस्‌ नवी मुंबईकरांच्या एकात्म स्वच्छता प्रेमाला समर्पित - आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : ‘इंडियन स्वच्छता लीग २' मध्ये सहभागी होताना नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सहभागी झालेल्या नवी मुंबई महापालिकेने लीग अंतर्गत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  स्वच्छताविषयक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांची विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने घेण्यात आलीच. शिवाय ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌' या राष्ट्रीय पातळीवर आगळ्यावेगळ्या विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थेमार्फतही यांची विशेष दखल घेत ‘इंडियन स्वच्छता लीग'मधील महापालिकेच्या ३ वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना ३ ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'ने गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेली सदर तिन्ही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'ची विक्रमी प्रमाणपत्रे ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'चे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू बी. बी. नायक यांनी महापालिकाआयुक्त राजेश नार्वेकर यांना प्रदान केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिवत शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग २'मध्ये ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईटस्‌' संघ सहभागी झाला आहे. या संघाचे कर्णधारपद सुप्रसिध्द संगीतकार, गायक तसेच स्वच्छ ‘नवी मुंबई मिशन'चे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन भूषवित आहेत. या अंतर्गत शहरात स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करीत त्यामध्ये हॅशटॅगच्या अनुषंगाने कचऱ्यााविरोधातील युवकांच्या लढाई नजरेसमोर ठेवून युवक सहभागावर विशेष भर देण्यात आला.

या अनुषंगाने शासन निर्देशानुसार १७ सप्टेंबर रोजी भव्यतम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात आठही विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातील मुख्य ९ ठिकाणी एकाच वेळी आयोजित केलेल्या सामुहिक शपथ उपक्रमात १.१४ लक्ष इतक्या मोठ्या संख्येने स्वच्छताप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी विक्रमी संख्येने सहभागी होत एकात्मतेचे आणि स्वच्छतेविषयीच्या जागरूकतेचे दर्शन घडविले. ५ ठिकाणी खाडीकिनारी राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहीमेत १०,५०० हून अधिक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. त्यातही युवकांची आणि विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती. याशिवाय लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या पुढाकाराने २३५ तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली. या वैशिष्ट्यपूर्ण अशा भव्यतम उपक्रमाची विशेष नोंद घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ यांच्या वतीने रेकॉर्डस्‌चे प्रमाणपत्र परीक्षक बी. बी. नायक यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे प्रदान केले.

अशाप्रकारे आणखी दोन विक्रम नोंदीत झाले असून यामधील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगाला साजेशा स्वच्छतेची डिजीटल शपथ असा उपक्रम नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क या ठिकाणी एका दिवसात २६,१३३ नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली. या सर्व्राधिक डिजीटल शपथ उपक्रमाचीही विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'ने घेतली.

याशिवाय ‘इंडियन स्वच्छता लीग २' अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी महापालिका क्षेत्रातील खाजगी आणि महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील स्वच्छतेच्या संकल्पनांना चित्ररुप देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धा'मध्ये ४३१ शाळांतील १ लक्ष ८३ हजार १४४ विद्यार्थ्यांनी सहभागी होत ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'मध्ये नोंद होईल, असा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या रेकॉर्डस्‌चे प्रमाणपत्र यापूर्वीच महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले होते.

अशाप्रकारे ‘इंडियन स्वच्छता लीग २' अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने ३‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌' प्रस्थापित केले असून सदर तिन्ही विक्रम नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छताप्रेमाचे आणि एकात्म भावनेचे प्रचिती देणारे आहेत. ते तिनही विक्रम नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित करतो. नवी मुंबईकरांचा उत्साह आणि स्वच्छता माझी जबाबदारी आहे अशी मनापासून जपलेली भावना, स्वच्छ नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारी ठरेल. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

  १ ऑवटोबर रोजी पनवेल महापालिकेचा ७ वा वर्धापन