उरण तालुक्यात ८,४४४ बाप्पाची मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने प्रतिष्ठापना 

उरण तालुक्यात घरगुती ८,४२६ आणि  सार्वजनिक १८ अशा एकूण ८,४४४ श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना

उरण : गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे.उरण,मोरा - सागरी आणि न्हावा - शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ८,४२६ आणि  सार्वजनिक १८ अशा एकूण ८,४४४ श्री गणेशाच्या मूर्तीची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली आहे. यावेळी अनेक गणेश भक्तांनी आप आपल्या घरी चंद्रयानचा देखावा साकारला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उरण तालुक्यातील उरण,मोरा- सागरी आणि न्हावा -शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती ८,४२६ आणि सार्वजनिक १८ अशा एकूण ८,४४४ श्री गणेशाच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मात्र महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारच विघ्न गणेशोत्सवात भाविकांना पहिल्याच दिवशी सहन करावे लागल्याने भाविकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

पावसाने उघडीप दिल्याने गणेशोत्सवाचे औचित्य साधून अनेक भक्तांनी चिरनेर गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून मंदिरात गर्दी केली होती. मात्र यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना वाढत्या महागाईचा तसेच चिटफंड घोटाळ्यात अडकून पडलेल्या पैशाचा त्रास सहन करावा लागला आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महा.अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या स्वयं-अध्ययन परीक्षेचे पारितोषिक वितरण