१.१४ लाख विद्यार्थी, नागरिकांकडून स्वच्छतेची  शपथ

नवी मुंबईकरांकडून एकात्मतेचे, स्वच्छतेविषयीच्या जागरुकतेचे दर्शन

नवी मुंबई : ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये सहभागी होत नवी मुंबई महापालिकेने ९ ठिकाणी आयोजित केलेल्या सामुहिक शपथ उपक्रमात तसेच ठिकाणच्या खारफुटी स्वच्छता मोहिमेत १ लाख १४ हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी विक्रमी संख्येने सहभागी होत एकात्मतेचे आणि स्वच्छतेविषयीच्या जागरुकतेचे दर्शन घडविले.

‘इंडियन स्वच्छता लीग २.०' मध्ये महापालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईटस्‌' संघ सुप्रसिध्द संगीतकार, गायक तथा स्वच्छ ‘नवी मुंबई मिशन'चे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली सज्ज असून १२ सप्टेंबर पासून स्वच्छता सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात आहे.

यामधील सर्वात महत्वाचा आणि भव्यतम असा उपक्रम १७ सप्टेंबर रोजी शहरात ९ विभागांमध्ये एकाचवेळी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये उपस्थित शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, शिक्षक, महिला बचतगट आणि महिला मंडळे, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, आबालवृध्द नागरिक अशा १ लाख १४ हजारहून अधिक विक्रमी संख्येने उपस्थित रहात स्वच्छतेची शपथ ग्रहण केली.

यामध्ये बेलापूर विभागात राजीव गांधी क्रीडा संकुल, सीबीडी-बेलापूर आणि इतर ठिकाणी १०,५०० हून अधिक नागरिक, नेरुळ विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई आणि इतर ठिकाणी २१,८०० हून अधिक नागरिक,  वाशी विभागत मॉडर्न महाविद्यालय मैदान आणि इतर ठिकाणी १३,९०० हून अधिक नागरिक, तुर्भे विभागत जयपुरिया स्वुÀल जवळ, सानपाडा येथे १०,७०० हून अधिक नागरिक, कोपरखैरणे विभागात निसर्ग उद्यान या ठिकाणी १२,३०० हून अधिक नागरिक, घणसोली विभागात सेंट्रल पार्क या ठिकाणी ६,४०० हून अधिक नागरिक तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणात रबाले येथे ५,२००नागरिक तसेच दिघा विभागात नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगणात ४५०० हून अधिक नागरिक अशा प्रकारे आठ वॉर्डांत नऊ मुख्य आणि इतर काही ठिकाणी एकत्र येत एकूण १ लक्ष १४ हजारहून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उपक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याठिकाणी आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छता शपथ सामुहिकरित्या घेतली. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या भागात स्वच्छता मोहिमा राबवून त्याठिकाणीही स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. याप्रसंगी लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागातील उपक्रमांच्या ठिकाणी उपस्थिती दर्शाविली.

 यावेळी ५ ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घ्ोतली. वाशी विभागात २३५ तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२६,१३३ नागरिकांची स्वच्छतेची डिजीटल शपथ