वाहतूकीतील बदलाची नोंद घेऊन वाहने चालविण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन  

श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल  

नवी मुंबई : श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, सीबीडी तसेच कळंबोली भागातील वाहतुकींमध्ये मोठया प्रमाणात बदल केले आहेत. त्यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दि. 20 सप्टेंबर  (दिड दिवस गणपती विसर्जन),23 सप्टेंबर (पाच दिवस गणपती विसर्जन), 25 सप्टेंबर (सात दिवस गणपती विसर्जन), 28 सप्टेंबर (दहा दिवस आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन) या दिवशी गणेश विसर्जन मार्गावर सकाळी 10 ते गणेश विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे. वाहतूकीतील हा बदल 29 सप्टेंबर रोजी होणा-या ईद ए मिलादच्या मिरवणुकीसाठी देखील कायम ठेवण्यात आला आहे.  


वाशीतील वाहतुकीत बदल  
वाशी व आजुबाजुच्या परिसरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती, शिवाजी चौक, सेक्टर-17 मार्गे वाशीतील जागृतेश्वर तलावात विसर्जनासाठी जात असतात. त्यामुळे शिवाजी चौकात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकांच्या कालावधीत येथील वाहतूकीत मोठया प्रमाणात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कोपरखैरणेकडून वाशी शहरात जाणाऱया इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या वाहनांना ब्ल्यु डायमंड सिग्नल चौक ते कोपरी सिग्नल वरुन पामबीच मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.  

तसेच वाशी रेल्वे स्टेशन व वाशी हायवेवरुन, मुंबई बाजुकडून वाशी शहरात येणाऱया वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने या वाहनांना वाशी फ्लाझा हायवे बसस्टॉप वरुन पुढे डावीकडे वळण घेऊन पामबीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कल, कोपरी सिग्नल वरुन जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाशी सेक्टर-9,10,11,12 मधुन मुंबई आणि वाशी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱया वाहनांसाठी महापालिका सार्वजनिक रुग्णालयासमोरुन जुहूगाव शिवसेना शाखा, सेक्टर-11, ब्ल्यु डायमंड सिग्नल चौक, कोपरी सिग्नल वरुन पामबीच मार्गे जाण्यासाठी पार्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.

कोपरखैरणेतील वाहतूकीत बदल  
संगम डेअरी, स्मशानभुमी (शंकर मंदीर) खाडी किनाऱया लगतचा रस्ता सेक्टर-19 ते वरिष्ठा चौक सेक्टर-20 कोपरखैरणेकडे जाणाऱया गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीच इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांना जीमी टॉवर्स चौक येथून उजवीकडे वळण घेऊन भिमाशंकर टॉवर्स सेक्टर-19 कोपरखैरणे येथून कल्पेश मेडीकल मार्गे इच्छित स्थळि जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

तुर्भे विभागातील वाहतूकीत बदल  
विसर्जनाच्या दिवशी चिंलवली तलाव रोडरवर सानपाडा मार्गे माणिकराव बंडोबा पाळकर चौकाकडे जाणाऱया मार्गावर इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे चिंचोली तलाव रोडवर सानपाडा कडुन येणारी वाहने गावदेवी चौक जुईनगर येथे वळवुन उजवीकडील जुई सोसायटी मार्गे सुखशांती नर्सरी येथुन इलेक्ट्रीक टॉवर चौकाकडुन इचछित स्थळी जाण्यास पार्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तसेच शिरवणे भुयारी मार्गाकडुन चिंचोली तलावाकडे जाणाऱया वाहनांना गणेश मंदीर येथुन शिरवणे मार्केट चौकातुन राजीव गांधी ब्रिज खालुन शिवाजी चौकातून राजीव गांधी ब्रिजवरुन समाधान चौकातून  उजवीकडून माणिकराव बंडोबा पाळकर चौकातून इच्छित स्थळी जाण्यास पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

सीबीडीतील वाहतूकीत बदल  
सीबीडी भागातील गणपतीचे विसर्जन हे आग्रोळी गाव येथील तलावात होत असल्याने कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर-15 कडे जाणारा रोड व सेक्टर-15 कडुन उड्डाणपुलावरुन कर्मविर भाऊराव पाटील चौकाकडे येणारा रस्ता गणेश विसर्जन मिरवणूकीतील वाहनांखेरीच इतर वाहनांसाठी बंद ठेवला आहे. त्यासाठी दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील रस्ता रेल्वे स्टेशन सेक्टर-11 मार्गे इच्छीत स्थळी जाण्यासाठी पार्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

कळंबोलीतील वाहतूकीत बदल  
विसर्जनाच्या दिवशी कळंबोलीतील करवली चौक, सेक्टर-2-केएल-2 नाका, हिंदुस्थान बँक चौक सेक्टर-8,एसबीआय बँक कॉर्नर, कारमेल चौक सेक्टर-6 सनशाईन सोसायटी, राजकमल सोसायटी सेक्टर-10 रोडपाली तलावाकडे जाणारा मार्गावर इतर वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. त्यासाठी कळंबोली सेक्टर-3 कडुन येणाऱया वाहनांना सनशाईन सोसायटी येथून कारमेल चौक, गुरुद्वारा चौक सेक्टर-11, पामविहार सोसायटी सेक्टर-15 येथून सेक्टर-17, सेक्टर-20 कडून इच्छित स्थळी जाण्यास पार्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे सनशाईन सोसायटी सेक्टर-6, राजकमल सोसायटी, सेक्टर-10 रोडपाली तलाव सेक्टर-12, स्माशन भुमी सेक्टर-12 महाराष्ट्र स्कुल सेक्टर-14 हा मार्ग नो पार्किंग करण्यात आला असून या मार्गावरुन इतर वाहनांना प्रवेश बंदी असल्याने या मार्गावरील वाहनांना रोडपाली सेक्टर-17, सेक्टर-20 कडून फ्लॅटीनम बिल्डींग, डीमार्ट कडुन इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात आला आहे.  

गणपती विसर्जनामुळे विविध ठिकाणच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केल्याने वाहन चालकांनी वाहतूकीतील बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपली वाहने चालवून वाहतूक विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल  महापालिकेच्यावतीने ७ सप्टेंबर रोजी  स्वच्छता रॅलीचे आयोजन