इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत महापालिकेच्या वतीने चारही प्रभागामध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन

पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत पंधरावड्यांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन चारही प्रभागामध्ये दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 1800 सफाई कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने केली जाणार आहे.

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्र शासनाने १५ सप्टेंबर २०२३ ते २ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर अभियानाचा एक भाग म्हणुन इंडियन स्वच्छता लीग २०२३ मध्ये सफाई मित्र सुरक्षा अंतर्गत सफाई कर्मचाऱ्याचे खारघर, कळंबोली,कामोठे, पनवेल प्रभाग समितीमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उपायुक्त सचिन पवार यांनी शिबीरांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी घनकचरा व आरोग्य विभा्ग प्रमुख अनिल कोकरे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

या आरोग्य शिबीरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे रक्तदाब, नाक,कान,डोळे, हिमोग्लोबीन , रक्त तपासणी अशी संपुर्ण तपासणी करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये सुमारे १८०० सफाई कर्मचारी कार्यरत असुन या कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना भिषक, स्त्रीरोग तज्ज्ञ, नाक, कान, घसा तज्ज्ञ, मानसोपाचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येत आहे.

या शिबिरासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.आनंद गोसावी यांच्या सूचनेनूसार पालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. तसेच कळंबोली आणि पनवेल मधील आरोग्य शिबीरासाठी एमजीएम वैद्यकिय महाविद्यालय, कामोठे येथील आरोग्य तपासणीसाठी तेरणा महाविद्यालय, खारघर मधील आरोग्य तपासणीसाठी येरळा वैद्यकिय महाविद्यालय यांनी महापालिकेस सहकार्य केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका प्रशासनाने विमा सुरक्षा कवच देण्याची मागणी