पनवेल महापालिका ‘इंडियन स्वच्छता लीग २.०'चे उद्‌घाटन

पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवली प्रतिकात्मक मानवी साखळी

पनवेल : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेच्या वतीने ‘इंडियन स्वच्छता लीग २.०'चे उद्‌घाटन नवीन पनवेल मधील पिल्लई आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी फलॅश मॉबच्या माध्यमातून घ्एथ्२.० नावाची ‘प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करण्यात आली.

यावेळी घनकचरा-आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, पिल्लई महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन वाडेर, प्राध्यापक किरण देशमुख आदि उपस्थित होते.

उपायुक्त सचिन पवार यांच्या सूचनेनुसार झालेल्या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या वतीने ‘इंडियन स्वच्छता लीग २.०' स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरांसाठी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुणांचा सहभाग होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

‘इंडियन स्वच्छता लीग २.०' स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरे निर्माण करण्याच्या दिशेने तरुणांच्या नेतृत्वाखाली देशातील मोठ्या शहरांमध्ये केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनची नऊ वर्षे आणि एँश्-ळ २.० ची दोन वर्षे साजरी करण्यासाठी, स्वच्छता ही सेवा पंधरवडा १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज १७ सप्टेंबर रोजी सेवा दिवस या ‘भारतीय स्वच्छता लीग'च्या दुसऱ्या आवृत्तीने पंधरवड्याची सुरुवात महापालिका चारही प्रभागामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग २.०' रॅलीने करणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'मध्ये अभियंता दिन साजरा