ठाणे मध्ये अमृत कलश यात्रेस प्रारंभ

अमृत कलश यात्रेस नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -आयुवत बांगर

ठाणे : मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश, मातील नमन वीरांना वंदन. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रेचा प्रारंभ ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या दुसऱ्या टप्प्यात ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विभागातील नागरिकांकडून अमृत कलशामध्ये माती किंवा तांदूळ गोळा करण्यात येणार आहे. त्यानुसार १४ सप्टेंबर रोजी नौपाडा प्रभाग समिती हद्दीत अमृत कलश यात्रा काढून घराघरातून माती आणि तांदूळ जमा करण्यात आले. या यात्रेत ठाणे महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ‘टीडीआरएफ'चे जवान, सुरक्षारक्षक तसेच शाळांमधील स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या अमृत कलश यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर सायंकाळी राम गणेश गडकरी रंगायतन येथील आवारात पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाच्या वतीने बँड वाजूवन या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण मासुंदा तलावाभोवती काढण्यात आलेल्या या अमृत कलश यात्रेत घोडागाडी, अग्शिनशमन दलातील वाहने, रुग्ण्वाहिका, आपत्कालीन विभागाची वाहने सहभागी झाले होते. अमृतकलश यात्रा ३० सप्टेंबर पर्यत महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभाग समिती अंतर्गत फिरणार आहे. या कलशामध्ये जमा झालेली माती आणि तांदूळ ठाणे महापालिका मुख्यालयाच्या माध्यमातून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. तद्‌नंतर अमृत कलश राज्य शासनामार्फत नवी दिल्ली मधील कर्तव्यपथ येथे उभारण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेमध्ये मिसळण्यात येणार आहे.

देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अमृत कलश यात्रा अभियानामध्ये ठाणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपला सेल्फी, फोटो,  व्हिडीओ [email protected]  या ई-मेलवर पाठविण्यात यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत काढण्यात आलेल्या सदर यात्रेत अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, आदि सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत बाप्पांचे विसर्जन शांततेत होणार!