लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात आजी -आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा

13 सप्टेंबर रोजी आजी - आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा

पनवेल : माननीय आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकांच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षण विभाग प्रमुख किर्ती महाजन यांच्या सूचनेनूसार महानगरपालिका शाळा क्र. १ लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय येथे दिनांक 13 सप्टेंबर रोजी आजी - आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी १ ली ते ७ वीच्या विदयार्थ्याच्या आजी आजोबांना आमंत्रित केले होते. यावेळीउपस्थित आजी- आजोबांना औक्षण करून गुलाबपुष्प देण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या  मुख्याध्यापक अनुपमा डामरे  यांनी सर्वांचे स्वागत करून मुलांना मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी आजी आजोबां विषयी आपले मनोगत व्यक्त केले. काहींनी सुंदर अशा कवितांचे गायन करून वातावरण प्रसन्न करून टाकले.

यावेळी आजी- आजोबांचा संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुले व सर्व शिक्षक वृंद खरोखर समाधानी झाले. उपस्थितांपैकी काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेचे आभार मानले. तसेच आजी आजोबा दिन साजरा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व अशा प्रकारचे उपक्रम राबवत रहावे अशी भावना व्यक्त कली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘इंडियन स्वच्छता लीग'साठी पनवेल महापालिका सज्ज