लहान मुलांनी घडवल्या शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती

समीर बागवान आणि संस्कार फाऊंडेशन यांच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याची कार्यशाळा

नवी मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे प्रदुषण टाळून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख समीर बागवान आणि संस्कार फाऊंडेशन यांच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रसिध्द शिल्पकार रुपाली पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांनी तसेच लहान मुलांनी या कार्यशाळेत मातीच्या गोळ्यापासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण घेतले.

स्वतःच्या हाताने बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्यात दंग झालेल्या लहानग्यांनी यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळण्यासाठी कुटुंबीय आणि आपल्या मित्रमंडळीत जनजागृती करण्याची शपथ देखील घेतली. सीवुडस्‌ मधील जाट समाज भवन येथे आयोजित सदर कार्यशाळेमध्ये शंभरहुन अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गोळे वाटप करण्यात आले. या गोळ्यांमध्ये विविध झाडांच्या बियाही पेरण्याबाबत सूचना करण्यात आली. या गोळ्यांपासून गणपती बाप्पा घडवण्याचे प्रशिक्षण मुलांनी घेतले.

कार्यशाळेला मार्गदर्शन करताना शिल्पकार रुपाली पाटोळे यांनी शाडूच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणदृष्ट्या असलेले महत्व विषद करुन सांगितले. तसेच मूर्ती घडवताना शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक विचारांची विसर्जन होते, असेही त्या म्हणाल्या. रुपाली पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवल्याप्रमाणे आबालवृध्दांनी गणेशमूर्ती साकारल्या. या गणेशमूर्तींना अखेरचा हात फिरवून त्या अधिक आकर्षक करण्याची किमया पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

 शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, मिलिंद सूर्यराव, संतोष घोसाळकर, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, शहर संघटिका कोमल वास्कर, उपशहर संघटक कुंजन पाटील, विभाग संघटक दिपा कडू, विभाग प्रमुख मिलिंद भोईर, संतोष दळवी, संजय भोसले, विशाल विचारे, शाखाप्रमुख अनिल पाटील, विनायक पुकाळे, बंकट तांडेल सर, आदि मान्यवरांनी या उपक्रमास भेट दिली.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख राजेंद्र मोकल, उपविभाग प्रमुख मुबीन काझी, उपविभाग संघटक विणा महाडेश्वर, शाखा संघटक निरंजना राणे, जास्मिन बागवान, भारती वैती, सीमा संकपाळ, स्वाती बच्चू, मिसबा, शाखाप्रमुख संतोष सावंत, शाखाप्रमुख जितेंद्र कोंडस्कर, विभाग अधिकारी केदार बनसोडे, उपशाखा प्रमुख विद्याधर महाडेश्वर, प्रमोद कर्णेकर, आशिष गायकवाड, श्रीकृष्ण संकपाळ, शैलेश राणे, ज्येष्ठ शिवसैनिक प्रधान, जगन्नाथ शेट्टी, सादिक बागवान, उदय बारगुडे, अक्षय गमरे, अजित गमरे, शिवम ठाकूर, साहिल, आदिंनी मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण