भारतीय पोर्ट अँण्ड डॉक मजदूर संघाचे दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबीर
भारतीय पोर्ट अँण्ड डॉक मजदूर संघाचे दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा यांच्या हस्ते उदघाटन.
उरण : भारतीय पोर्ट अँण्ड डॉक मजदूर संघाचे दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबीराला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टर्स कॉम्लेक्स, उलवे नोड येथे सुरवात झाली. या शिबीराचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजबिहारी शर्मा यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकुर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय मजदूर संघाविषयी गौरवोदवार काढले. 'भारतीय मजदूर संघ ही राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेली, देशातील नव्हे तर जगातील बलाढ्य कामगार संघटना असून राष्ट्रहितासाठी सर्वस्व पणाला लावणारी कामगार संघटना आहे! आपण जी जबाबदारी दयाल ती आपण पार पाडू असे सांगताना असंघटीत कामगारांसाठी न्याय मिळवून देताना आपले कायम सहकार्य राहिल असे आश्वासीत केले.
या दोन दिवसीय अभ्यास वर्ग शिबीसासाठी देशभरातील 11 प्रमुख बंदरातील 60 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर पोर्ट प्रभारी चंद्रकांत (अण्णा) धुमाळ, पोर्ट सह-प्रभारी सी. की चावडा, रवींद्र देशपांडे, पुनीत गौतम, भारतीय पोर्ट ऍण्ड डॉक मजदूर महासंघाचे अध्यक्ष प्रदीप बिजली, महामंत्री सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत आदी पदाधिकारी उपस्थित होते.