पनवेल महापालिकेच्या वतीने  वैद्यकीय आरोग्य विभागाच्या जनजागृतीपर विशेष कार्यक्रम

पनवेल महापालिकेच्या वतीने निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्ताने विशेष कार्यक्रम

पनवेल : दिनांक ७ सप्टेंबर हा निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ८ सप्टेंबर रोजी जनजागृतीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. आनंद गोसावी यांच्या सुचनेनूसार लोकनेते दि.बा.पाटील शाळा,कोळेश्वर शाळेतील विद्यार्थी , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ येथे सफाई कर्मचाऱ्यासाठी व कळंबोली येथील पोलिस विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी पुरूषोत्तम जैसवाल , कार्यक्रम अधिकारी सरू गुप्ता, वैद्यकिय अधिकारी डाॅ.रेहाना मुजावर, डाॅ. नेहा म्हात्रे,डाॅ.अनिल पाटील, साथ रोग वैद्यकीय अधिकारी डाॅ. आकाश ठसाळे, परिचारिका गीता कुरुकले आदि उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना, सफाई कर्मचारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना वायू प्रदुषणाविषयी माहिती सांगून वायू प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाय योजना सांगितल्या.

आपण वायू प्रदूषण पाहू शकत नाही, परंतु ते सर्वत्र पसरले आहे. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी अंदाजे 7 दशलक्ष अकाली मृत्यू होतात , त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वायु प्रदूषणाविषयी माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे . निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस सर्वांसाठी स्वच्छ हवा सुनिश्चित करण्यासाठी, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सर्व देशांना एकत्रितपणे काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जागतिक स्तरावरावरती नागरिकांमध्ये वायु प्रदूषणाच्या परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आरटीओ'कडून बसचे दरपत्रक जाहीर; तक्रारीसाठी फोन क्र.८८५०७८३६४३