‘आरटीओ'कडून बसचे दरपत्रक जाहीर; तक्रारीसाठी फोन क्र.८८५०७८३६४३

निर्धारित दरांपेक्षा ज्यादा दर आकारल्यास कारवाई - हेमांगिनी  पाटील

वाशी : गणेशोत्सव निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी बस चालक मनमानी भाडे आकारुन त्यांची लूट करतात. मात्र, या लुटीला आता चाप बसणार असून कोकणात जाणाऱ्या ‘खाजगी बसेस'चे दरपत्रक ‘आरटीओ'ने जाहीर केले आहे. ‘आरटीओ'ने केलेल्या सदर निर्धारित दरांपेक्षा खाजगी बसेस मालकांनी ज्यादा दर आकारल्यास कारवाई  केली जाईल. त्याअनुषंगाने तक्रारीसाठी ‘आरटीओ'ने फोन नंबर देखील प्रसिध्द केला आहे.

गणेशोत्सव साठी मुंबई स्थित कोकणातील चाकरमानी गावाची वाट धरतात. तर रेल्वे तिकीट आधीच फुल्ल होत असल्याने चाकरमानी प्रवासी खाजगी बसचा चार आधार घेतात. अशावेळी खाजगी बस चालकांकडून ज्यादा दर आकारुन चाकरमान्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे  ऐनवेळी प्रवाशांची लुटमार होते. त्यामुळे या लुटमारीला आळा बसावा म्हणून ‘आरटीओ'ची या खाजगी बसेस वर आधीच नजर आहे; शिवाय कोकणातील विविध मार्गांवर धावणाऱ्या खाजगी बसेस ना दर प्रत्रक निश्चित केले आहे.

‘आरटीओ'ने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडे आकारण्याचा सूचना नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी बस वाहतुकदारांना केल्या आहेत. सदरचे दरपत्रक प्रत्येक महत्वाच्या बस थांब्यांवर लावण्यात आले आहेत. तसेच ज्यादा भाडे आकरणाऱ्यांविरोधात तक्रारीसाठी ‘आरटीओ'ने फोन नंबर देखील प्रसिध्द केले आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या दरांप्रमाणे भाडे आकरावे अन्यथा खाजगी बस चालकांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा ‘नवी मुंबई'च्या उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे.

‘आरटीओ'ने निश्चित केलेले दर (रुपये), थांबेः
वाशी ते महाड - ४२८ वाशी ते खेड - ५७८ वाशी ते चिपळूण - ६२३
वाशी ते दापोली - ५३३ वाशी ते श्रीवर्धन - ४२८ वाशी ते संगमेश्वर - ७२८
वाशी ते लांजा - ८९३ वाशी ते राजापूर - ९५३ वाशी ते रत्नागिरी - ८४८
वाशी ते देवगड - ११८५ वाशी ते गणपतीपुळे - ९७५ वाशी ते कणकवली - १११०
वाशी ते कुडाळ - ११८५ वाशी ते सावंतवाडी - १२६० वाशी ते मालवण - १२१५
वाशी ते जयगड - ९५३ वाशी ते विजयदुर्ग - १२०० वाशी ते मलकापूर - ९०८
वाशी ते पाचल - ९९० वाशी ते गगनबावडा - १११० वाशी ते साखरपा - ८१८ 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओएनजीसीच्या प्रकल्पातून तेल गळती; तेलाचे तवंग सर्वत्र पसरले