‘महावितरण'च्या डीपी लगत पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी

 

‘महावितरण'च्या आवारातील झाडांच्या बाहेर आलेल्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-६ मधील ‘महावितरण'च्या डीपी लगत पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याबाबत तसेच ‘महावितरण'च्या आवारातील झाडांच्या बाहेर आलेल्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याची मागणी प्रभाग क्र.८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

नेरुळ, सेक्टर-६ परिसरात ‘सिडको'च्या शिवम आणि सागरदीप सोसायटीच्या लगत तसेच मेरेडीयन आणि शिवालिक सोसायटी समोर ‘महावितरण'ची विद्युत डीपी आहे. या विद्युत डीपीच्या आवारात अनेक झाडे आहेत. शिवम सोसायटीच्यामंदिरालगतच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शिवालिक सोसायटीच्यासमोर झाडांच्या फांद्या थेट पदपथापर्यत झुकल्या आहेत. पदपथावरुन ये-जा करणाऱ्या त्या फांद्यांचा त्रास होत आहे. तसेच मेरेडियन सोसायटीच्या विरुध्द दिशेला ‘महावितरण'च्या पदपथावर असलेला महापालिकेचा दिशादर्शक फलकही या झाडांच्या फांद्यांमुळे झाकला गेला आहे.

७ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसात ‘महावितरण'च्या आवारातील झाडांच्या फांद्या वाऱ्यामुळे पदपथावर पडल्या आहेत. त्यामुळे पदपथ चालण्यासाठी बंद झाला आहे. यासाठी संबंधितांना त्या फांद्या तात्काळ हटविण्याचे तसेच पदपथावर आलेल्या आणि झुकलेल्या फांद्या तात्काळ छाटण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा सदर फांद्या कोणा बालकाच्या अथवा ज्येष्ठ नागरिकावर पडल्यास दुर्घटना होण्याची भिती आहे. त्यामुळे सदर समस्येचे गांभीर्य बघता आपण तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देवून स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची
मागणी माजी नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाडूच्या गणेशमुर्तीची कला जिवंत ठेवणारे ‘चिरनेर'चे कलानगर